दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय; बृजभूषण शरण सिंह यांची POCSO प्रकरणातून सुटका

Published : Aug 03, 2026, 11:43 AM IST
brij bhushan

सार

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना POCSO प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना पॉक्सो (POCSO) प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारत पॉक्सो प्रकरणातील कार्यवाही संपवली. या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी समाधान व्यक्त केले.

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर प्रकरण चर्चेत

महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलनही झाले होते. मात्र, बृजभूषण शरण सिंह यांनी सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता.

 

 

न्यायालयाने काय म्हटले?

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. न्यायालयाने तो स्विकारत पॉक्सो प्रकरणात पुढील कारवाईची गरज नसल्याचे नमूद केले. पुरेशा पुराव्याअभावी ही कार्यवाही बंद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

इतर गुन्ह्यांवरील खटला सुरूच

या प्रकरणात POCSO अंतर्गत दिलासा मिळाला असला, तरी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354, 354A आणि 506 अंतर्गत दाखल असलेल्या आरोपांवरील न्यायालयीन प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू आहे. या प्रकरणात यापूर्वी न्यायालयाने आरोप निश्चित करून सुनावणीला परवानगी दिली होती.

निर्णयानंतर बृजभूषण यांची प्रतिक्रिया

न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी, "मी सुरुवातीपासून जे सांगत होतो, तेच आज खरे ठरले," अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वकिलांनीही तक्रार आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा सुरुवातीपासून मांडला होता आणि न्यायालयाचा निर्णय त्याच अनुषंगाने आल्याचे सांगितले.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Rahul Gandhi Net Worth : राहुल गांधींची संपत्ती किती कोटींची? कुठे केलीय गुंतवणूक?
Godavari River : गोदावरी नदी समुद्राला मिळते तिथे घडतो हा चमत्कार