कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार का?

Published : Aug 03, 2026, 09:18 AM IST
Petrol Saving Tips

सार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी कारवाई तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे केल्यानंतर जागतिक तेल बाजारात मोठी घसरण झालीये.

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. इराणवरील प्रस्तावित लष्करी कारवाई सध्या स्थगित करण्यात येणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. यानंतरआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यामुळे भारतासारख्या कच्चे तेल मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्या देशांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे.

ब्रेंट आणि WTI कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

बाजार सुरू होताच ब्रेंट क्रूड फ्युचर्सच्या किंमतीत 5.52 डॉलर (6.28%) इतकी घसरण झाली. तसेच दर 82.41 डॉलर प्रति बॅरलवर आले. याशिवाय WTI क्रूडच्या किमतीत 5.27 डॉलर (6.22%) घट होऊन ते 79.40 डॉलर प्रति बॅरलवर होते.

ट्रम्प यांनी इराणवरील कारवाई स्थगित

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर तातडीने लष्करी हल्ला करण्याची योजना सध्या पुढे ढकलल्याचे जाहीर केले. अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कमी करण्यासह युद्ध टाळण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे संकेत त्यांनी दिले. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'Truth Social' वरून केली घोषणा

शनिवारी उशिरा रात्री ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. यामध्ये सांगितले की, इराण आणि मध्य-पूर्वेतील काही देशांनी करार पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्यानंतरच त्यांनी लष्करी कारवाई स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारतासाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर सध्याच्या पातळीवर कायम राहिले किंवा आणखी कमी झाल्यास सरकारी तेल कंपन्यांवरील खर्चाचा ताण कमी होऊ शकतो. परिणामी, येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

College Life: 'ते दिवस खूप भारी होते', कॉलेजच्या आठवणीत रमलेल्या तरुणाची पोस्ट व्हायरल
UP Teacher Suspended: विद्यार्थ्याच्या टक्कलवर शिक्षकाने वाजवला तबला, व्हिडिओ व्हायरल