आयटी कंपनीत महिलांवरील अत्याचार प्रकरण | भाजपचा मोर्चा आणि कठोर कारवाईची मागणी

आयटी कंपनीत महिलांवरील अत्याचार प्रकरण | भाजपचा मोर्चा आणि कठोर कारवाईची मागणी

Published : Apr 10, 2026, 05:02 PM IST

शहरातील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये महिलांवरील विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धर्मांतराच्या प्रयत्नाच्या गंभीर आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. या घटनांविरोधात Bharatiya Janata Party कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत कंपनी कार्यालयावर धडक दिली आणि जोरदार घोषणाबाजी केली. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, महिला सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.