
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी, 6 नोव्हेंबर 2025 रोजी 121 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी जाहीर झालेल्या विविध ओपिनियन पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल ऑफ पोल्सनुसार एनडीए सरकार स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून एनडीएला 143, महागठबंधनला (MahaAghadi) 95 आणि इतरांना 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
IANS–MATRIZE च्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्तेत येण्याची शक्यता आहे. 243 जागांपैकी एनडीएला 153 ते 164 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महागठबंधन 76 ते 87 जागांवर थांबू शकते. या सर्वेक्षणात भाजपला 83–87 जागा, जेडीयूला 61–65 जागा, एचएएमला 4–5 जागा, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ला 4–5 जागा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला 1–2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महागठबंधनबाबत IANS सर्व्हेनुसार आरजेडी 62–66 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 7–9 जागा, सीपीएम (एमएल) ला 6–8, सीपीआय व सीपीएमला 0–1 जागा मिळू शकतात. तसेच AIMIM आणि जनसूरज पक्षालाही 1–3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या पोलनुसार एनडीएला 130 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात तर महागठबंधनला 110 पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्ष 5 ते 9 जागा मिळवू शकतात, असे सर्व्हेमध्ये नमूद आहे.
पोलस्ट्रॅटनुसार एनडीएला 133 ते 143 जागा मिळू शकतात. भाजपला 70–72 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महागठबंधनला 93–102 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षालाही 1–3 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात नमूद आहे.
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे.
या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन आमनेसामने असणार असून एनडीएमध्ये जनता दल संयुक्त आणि भाजप हे प्रमुख पक्ष आहेत.