Congress : काँग्रेस पक्षाचे नेते विवेक तन्खा म्हणाले की, या प्रकरणातील आजच्या सुनावणीनंतर कर विभागाने खाती अनलॉक केली आहेत.
Congress : काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेली बँक खाती आयकर विभागाने (IT) गोठवली होती. पण यानंतर आयटी न्यायाधिकरणाकडून काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर कर विभागाने खाती अनलॉक केली आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते विवेक तन्खा यांनी दिली आहे.
नेमके काय प्रकरण?
काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या बँक खात्यांमध्ये जवळपास 14 लाख रुपयांचे रोख व्यवहार आणि वर्ष 2018-19च्या कर परतावा प्रक्रियेमध्ये उशीर झाल्याने 14 फेब्रुवारी रोजी खाती गोठवण्याची कारवाई करण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.
काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी काय सांगितले?
काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, कोर्टाने माझे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. मी त्यांना सांगितले की, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, त्यामुळे आम्हाला अन्यायकारक पद्धतीने शिक्षा होऊ शकत नाही. मी न्यायालयात असेही सांगितले की आमच्यावर (काँग्रेस) 15 कोटी रुपयांचा कर कसा लावला जाऊ शकतो? आम्हाला यावर चर्चा करण्याची परवानगी हवी आहे. दरम्यान आता न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाला बँक खाती वापरता येणार आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी (21 फेब्रुवारी) होणार आहे.
अजय माकन यांनी दिलेली माहिती
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, "काही आठवड्यांपूर्वी पक्षाची बँक खाती गोठवली गेली होती आणि पक्षाकडे वीज बिल भरण्यासाठीही पैसे नाहीत. आमच्याकडून बँकांना पाठवण्यात येणाऱ्या धनादेशाची पूर्तता होत नसल्याची माहिती एक दिवस आधी मिळाली. अधिक चौकशी केली असता, युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आल्याचे कळले. काँग्रेस पक्षाची खातीही जप्त करण्यात आली आहेत. आमच्या खात्यातील क्राउडफंडिंगचीही रक्कम गोठवली गेली".
आयकर विभागाने का केली कारवाई, काय आहे नेमके प्रकरण?
आणखी वाचा
सुप्रीम कोर्टाकडून Electoral Bonds योजना रद्द, SBIला 3 आठवड्यांत द्यावा लागेल अहवाल
'आम्हाला मोदींची लोकप्रियता कमी करायचीय...', शेतकऱ्यांच्या आंदोलनामागील अजेंडा VIRAL VIDEOद्वारे उघड