
महाराष्ट्रात मुलांसाठी हिंदी भाषा सक्तीची केली होती पण नंतर सरकारने या निर्णयाला विरोध केला. या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी विरोध केला होता. नंतर सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी सभेचं आयोजन केलं होत. या सभेला अलोट गर्दी आली होती आणि यावेळी दोन्ही भावांनी एकजुटीने एकत्र येऊन मराठी भाषेला राज्यात धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली.
भोजपुरी अभिनेत्यानं या निर्णयाला मात्र विरोध केला आहे. हिंदीचा मुद्दा उचलून धरत त्याने मला मराठी बोलता येत नाही दम असेल तर मला महाराष्ट्रातून काढून दाखवा असं विधान करत थेट ठाकरे बंधूंना चॅलेंज दिल. दिनेश लाल यादव असं त्या अभिनेत्याचं नाव असून तो भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीतील खूप मोठा अभिनेता आहे.
मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. मी सर्वांना चॅलेंज देतो जर तुमच्यात हिम्मत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलवून दाखवा! असं या अभिनेत्यानं म्हटलं आहे. त्यानं वाराणसीमध्ये बोलताना हे मत व्यक्त केलं. मी मराठी बोलत नाही मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा. तुम्ही गरिबांना का लक्ष्य करता? खरंतर हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचे राजकारण करत आहेत. देशातल्या कोणत्याही भागात भाषेच्या नावावर द्वेष किंवा हिंसा होऊ नये. भारत हा विविध भाषा आणि संस्कृतींनी नटलेला म्हणून ओळखला जातो. या विविधतेतूनच एकता साधली जाते, असंही तो पुढं बोलला आहे.