Bengaluru Techie: महिन्याला ६३ हजार खर्च! बंगळुरूमधील २६ वर्षीय तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

vivek panmand   | CMS
Published : Oct 04, 2026, 06:09 PM IST
photo

सार

महिन्याच्या शेवटी जेव्हा मी खर्चाचा हिशोब केला, तेव्हा ६३,००० रुपयांचा आकडा पाहून मला थोडी धडकीच भरली. पण यामुळे माझा पैसा नेमका कुठे जातोय, हे मला समजलं.

मेट्रो शहरांमध्ये राहण्याचा खर्च किती वाढलाय, हे सांगणारी एका २६ वर्षीय कॉर्पोरेट कर्मचारी तरुणीची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. शिवांजली असं या तरुणीचं नाव असून, तिने सप्टेंबर महिन्यातील तिच्या ६३,००० रुपयांच्या खर्चाचा संपूर्ण हिशोब एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलाय.

शिवांजली तिच्या मैत्रिणींसोबत एका 3BHK फ्लॅटमध्ये राहते. भाडं आणि मेंटेनन्स मिळून तिच्या वाट्याला महिन्याला २५,००० रुपये येतात. ऑफिसमध्येच नाश्ता आणि जेवण मिळत असल्याने तिचे तिथे थोडे पैसे वाचतात. रात्रीच्या जेवणासाठी तिने एक कूक लावलाय, ज्याचा पगार २,००० रुपये आहे. तर किराणा मालासाठी तिला ३,००० रुपये लागतात.

पण, ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्स आणि हॉटेलमधील जेवणावर तिचा सर्वात जास्त खर्च झालाय. स्विगी, झोमॅटोच्या ऑर्डर्स आणि बाहेरचं खाणं यावर तिने तब्बल १२,००० रुपये उडवलेत, असं ती सांगते.

याशिवाय, घरकामासाठी येणाऱ्या मावशींना १,००० रुपये, पेट्रोलसाठी ३,००० रुपये आणि ऑटो-कॅबच्या प्रवासासाठी ४,००० रुपये खर्च झालेत. जिम मेंबरशिप, एआय (AI) ॲप्स आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सच्या सबस्क्रिप्शनसाठी ६,००० रुपये, तर शॉपिंग आणि पर्सनल केअरसारख्या इतर गोष्टींवर ७,००० रुपये खर्च झालेत.

शिवांजलीने लिहिलंय, 'महिन्याच्या शेवटी जेव्हा मी खर्चाचा हिशोब केला, तेव्हा ६३,००० रुपयांचा आकडा पाहून मला थोडी धडकीच भरली. पण यामुळे माझा पैसा नेमका कुठे जातोय, हे मला समजलं.'

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी म्हटलंय की, कमी पगार असला तरी चालेल, पण आम्हाला गावाकडच्या शांत वातावरणात टेन्शन फ्री राहायला आवडेल. तर काहींनी लक्ष वेधून घेतलंय की, बंगळुरूमध्ये असेही लोक आहेत जे भाडं आणि जेवणासह महिन्याला फक्त ५,००० रुपयांत आपला उदरनिर्वाह करतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Student Union Elections: कॉलेज निवडणुका बंद करणं हा राडा थांबवण्याचा प्लॅन की नवा आवाज दाबण्याचा डाव?
Lovlina Borgohain: वाढदिवशी सुवर्णपदक जिंकणं खूप खास! आशियाई क्रीडा स्पर्धेत लवलिनाची ऐतिहासिक कामगिरी