बंगळुरुत एका प्रियकराने आपल्या लिव्ह-इन पार्टनरला रस्त्यावर जाळून ठार मारले. विशेष म्हणजे त्याचे आतापर्यंत तीन लग्न झाले आहेत. त्याने असे का केले याचा पोलिस शोध घेत आहेत.
संबंध तोडल्यामुळे दीर्घकाळ लिव्ह-इन पार्टनर राहिलेल्या महिलेला जिवंत जाळून ठार मारले, असे तपासकर्त्यांचं म्हणणं आहे. मृत महिलेचं नाव वनजाक्षी. आरोपीचे नाव विठ्ठल आहे. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या गाडीतच पेट्रोल टाकून त्याने आग लावली. महिलेला गाडीतून काढून रुग्णालयात नेण्यात आले, पण तिचा जीव वाचवता आला नाही.
25
बंगळुरुत हत्या
सिलिकॉन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरुमध्ये ही धक्कादायक घटना घडली. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या एका पांढऱ्या गाडीत एक व्यक्ती धावत येऊन पेट्रोल टाकतो. त्यानंतर काडीपेटीने आग लावतो. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपीचं लक्ष्य गाडीत बसलेली एक तरुणी होती. गाडीला आग लागल्यावर गाडीतील प्रवासी बाहेर पळू लागले. तेव्हा आरोपीने महिलेला पकडून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली.
35
सूडापोटी हत्या
हत्येचं कारण काय याचा पोलिस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांचा अंदाज आहे की, अनैतिक संबंधातल्या वादातूनच खून झाला असावा. मृत महिला आणि आरोपी सुमारे चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पण नुकताच त्यांचा ब्रेकअप झाला होता. मुख्यत्वे विठ्ठलच्या अतिरिक्त मद्यपानामुळे आणि बेजबाबदारपणामुळे संबंध बिघडले. अखेर वनजालक्ष्मीने संबंध तोडले.
वनजालक्ष्मीने यापूर्वी दोनदा लग्न केले होते. विठ्ठलशी संबंध तुटल्यानंतर वनजालक्ष्मी मारियाप्पा नावाच्या आणखी एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दुसरीकडे, विठ्ठलने वनजालक्ष्मीपूर्वी तीन लग्न केली होती. पण वनजालक्ष्मीने संबंध तोडल्यानंतर विठ्ठलने सूड म्हणून तिचा खून केल्याचा आरोप आहे.
55
वनजाक्षीचा मृत्यू
वनजालक्ष्मी तिचा मित्र मारियाप्पासोबत मंदिरातून परत येत होती. त्याचवेळी ही घटना घडली. वनजालक्ष्मीच्या शरीराचा सुमारे ६०% भाग जळाला. तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे, आरोपी विठ्ठलला २४ तासांत पोलिसांनी अटक केली.