Bengaluru Viral Video : बंगळुरूत गॅस सिलिंडरला अचानक आग, डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला

Published : Nov 04, 2026, 12:14 PM IST
Bengaluru Viral Video : बंगळुरूत गॅस सिलिंडरला अचानक आग, डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला

सार

बंगळुरूच्या मल्लेश्वरममध्ये गॅस डिलिव्हरी करताना एका सिलिंडरला अचानक आग लागली. गळती झालेल्या गॅसचा संपर्क दारात लावलेल्या दिव्याशी आल्याने हा भडका उडाला. सुदैवाने डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई : मंगळवारी बंगळुरूच्या मल्लेश्वरम भागात गॅस डिलिव्हरी करताना एका सिलिंडरने अचानक पेट घेतला. घराबाहेर लावलेल्या दिव्याशी गळती झालेल्या गॅसचा संपर्क आल्याने ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. सिलिंडर दारात आणून ठेवणारा डिलिव्हरी बॉय या आगीतून थोडक्यात बचावला. आग लागल्याचा हा अंगावर काटा आणणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मल्लेश्वरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. डिलिव्हरी बॉय खांद्यावरून सिलिंडर आणून घराच्या दारात ठेवत होता. मिळालेल्या माहितीनुसार, घरमालकाने काही वेळापूर्वीच अंगण धुवून पूजा केली होती आणि उंबरठ्यावर दिवा लावला होता. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, खांद्यावरून सिलिंडर खाली उतरवताना डिलिव्हरी बॉयचं त्या दिव्याकडे लक्ष गेलं नाही.

गळती होत असलेल्या गॅसचा दिव्याच्या ज्योतीशी संपर्क येताच अचानक भडका उडाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही सेकंदातच आगीने सिलिंडरला वेढा घातला, त्यामुळे डिलिव्हरी बॉयला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. पण त्याने प्रसंगावधान राखून तिथून लगेच पळ काढला. त्याच्या या चपळाईमुळे मोठा अनर्थ टळला.

पाहा व्हायरल व्हिडीओ

घटनेची माहिती मिळताच मल्लेश्वरम पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेमुळे एलपीजी सिलिंडर हाताळताना किती काळजी घेणं गरजेचं आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. विशेषतः जेव्हा आजूबाजूला दिवा किंवा मेणबत्तीसारख्या पेटत्या वस्तू असतात, तेव्हा जास्त सतर्क राहायला हवं. घरात सिलिंडर आणताना किंवा बसवताना नागरिकांनी आणि डिलिव्हरी बॉयने आजूबाजूला आग लागण्याची शक्यता असलेल्या वस्तू नाहीत ना, याची खात्री करावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Farmer Loan Waiver l देवेंद्र फडणवीसांकडून ७३ लाख शेतकऱ्यांना ₹५००० l Devendra Fadnavis
Seva Cafe Ahmedabad : या कॅफेमध्ये जेवल्यावर बिल भरायची गरज नाही! पण पुढच्या ग्राहकासाठी काय करावं लागतं माहितीये?