Amazon चे पार्सल उघडल्यानंतर कपलची दाणादाण, विषारी साप आढळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch)

Published : Jun 19, 2024, 09:04 AM ISTUpdated : Jun 19, 2024, 09:10 AM IST
Bengaluru Couple Finds Venomous Snake Inside Amazon Package

सार

अ‍ॅमेझॉन कंपनीकडून एका कपलने पार्सल मागवले होते. पण पार्सल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये चक्क साप आढळल्याच्या प्रकारामुळे कपलची चांगलीच दाणादाण झाली. या घटनेचा व्हिडीओ कपलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Viral Video : बंगळुरु येथे राहणाऱ्या एका कपलने ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवरुन (Amazon) एक पार्सल मागवले होते. पार्सल घरी आल्यानंतर उघडून पाहिले असता कपलची चांगलीच दाणादाण झाली. खरंतर, कपलने अ‍ॅमेझॉनवरुन एक Xbox कंट्रोलर ऑर्डर केला होता. या ऑर्डरच्या पार्सलमधून चक्क कोबरा साप मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सध्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कपलने शेअर केला व्हिडीओ
कपलने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर शेअर केला आहे. कपलने म्हटले की, “आम्ही दोन दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉनवरुन Xbox कंट्रोलर ऑर्डर केले होते. याच ऑर्डरच्या पाकिटातून कोबरा साप आल्याचे समोर आले आहे. आम्ही सरजापुर रोड येथे राहत असून नक्की काय घडले हे देखील काहींना पाहिले आहे.”

महिलेने पुढे म्हटले की, “सुदैवाने साप पॅकेजिंग चिकटपट्टीला चिकटला होता. यामुळे आमच्या घरासह अपार्टमेंटमधील कोणाचेही नुकसान झाले नाही. वाईट गोष्ट अशी की, कंपनीच्या कस्टमर सर्विसने दोन तासांपर्यंत स्थिती तुम्हीच सांभाळा असे उत्तर दिले. यामुळे मध्यरात्रीच्या वेळेस सापाला सांभाळावे लागले. आम्हाला पार्सलचे पूर्ण पैसे परत मिळाले आहेत. पण विषारी सापासोबत घरात झोपल्याने आम्हाला काय मिळणार होते? अशातच स्पष्टपणे अ‍ॅमेझॉन कंपनीचा बेजबदारपणा दिसून येतोय. याशिवाय ट्रान्सपोर्टेशन आणि गोदामाच्या अस्वच्छतेमुळेच कस्टरमच्या सुरक्षिततेचे उल्लंघन झाल्याचेही महिलेने म्हटले आहे.”

कंपनीने दिले उत्तर
कपलच्या व्हिडीओवर कंपनीने उत्तर देत म्हटले की, "अ‍ॅमेझॉन ऑर्डरकडून तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल आम्हाला खेद आहे. याची आम्ही तपासणी करू. कृपया तुम्ही आम्हाला आवश्यक असणारी माहिती द्या. आमची टीम तुम्हाला माहिती देईल. आम्ही लवकरच तुम्हाला संपर्क करू."

आणखी वाचा : 

Bomb Threat : चेन्नईहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Bridge Collapse Viral Video : 12 कोटी खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला, ब्रीज कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!