चंद्रशेखर बावनकुळे भूमाफियांवर आक्रमक, राज्यात जमिनींचं मॅपिंग सुरू | Land | Mapping | Nagpur

चंद्रशेखर बावनकुळे भूमाफियांवर आक्रमक, राज्यात जमिनींचं मॅपिंग सुरू | Land | Mapping | Nagpur

Published : May 26, 2026, 04:02 PM IST

राज्यातील सरकारी आणि खासगी जमिनींचे संपूर्ण मॅपिंग करण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतल्याची माहिती मंत्री Chandrashekhar Bawankule यांनी दिली. भूमाफियांनी बळकावलेल्या जमिनी परत घेण्यासाठी कठोर कारवाई आणि मोक्का लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. पडीत शेतजमिनींवरही सरकार कठोर भूमिका घेणार असून शेती न केल्यास कुळ कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे बावनकुळे म्हणाले. नागपूर बाह्य वळण मार्ग आणि नवीन नागपूर प्रकल्पासाठी स्टॅम्प ड्युटी माफीचाही निर्णय मंत्रिमंडळात झाल्याची माहिती त्यांनी दिली.