Bank Holiday : बकरी ईदनिमित्त आज या 4 राज्यातीलच बँक राहणार खुल्या, वाचा RBI ने काय म्हटले

Published : Jun 07, 2025, 08:44 AM ISTUpdated : Jun 07, 2025, 08:46 AM IST
bank

सार

आज 7 जूनला शनिवार आणि याच दिवशी संपूर्ण देशात बकरी ईद (इद-उल-जुहा) साजरी केली जात आहे. सर्वसामान्यपणे बकरी ईदच्या वेळी बँकांना सुट्टी दिली जाते. पण यंदा काही राज्यांमध्ये बँका खुल्या राहणार आहेत. 

Bank Holiday 2025 : संपूर्ण देशभरात आज बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्यपणे बकरी ईदच्यानिमित्त बँकांना सुट्टी जाहीर केली जाते. पण यंदा काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आलेली नाही. अशातच आज काही राज्यातील बँकांना सुट्टी तर काही खुल्या राहणार आहेत. याबद्दलचेच अपडेट्स येथे जाणून घ्या.

संपूर्ण देशभरात आज बँका बंद राहणार?

खरंतर, 7 जूनला देशात बकरी ईद साजरी केली जात असली तरीही काही ठिकाणी बँका सुरू राहणार आहेत. बकरी ईद एक प्रादेशिक सणाच्या कॅटेगरीत असून वेगवेगळ्या राज्यांमध्ये यासंदर्भात सुट्टीची स्थितीही वेगळी असते. आरबीआयच्या मते, बकरी ईदच्या वेळी केवळ त्याच राज्यामधील बँका बंद राहतील जेथे राज्यातील सण म्हणून सुट्टी देण्यात आली आहे.

या राज्यात खुल्या राहणार बँका

गुजरात, केरळ, आसाम आणि सिक्कीम या ठिकाणच्या बँका खुल्या राहणार आहेत. कारण आज जून महिन्यातील पहिला शनिवार आहे. अन्य राज्यात बकरी ईदच्या कारणास्तव बँका बंद राहणार आहेत. 7 जूनला पहिला शनिवार आहे. सर्वसामान्यपणे बँका पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरू राहतात. पण काही राज्यांमध्ये बकरी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे बँका बंद राहणार आहेत.

या राज्यांमध्ये बँका बंद

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, गोवा, उत्तराखंड, गुजरात, सिक्कीम, युपी, दिल्ली, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा येथील बँका आज बंद राहणार आहेत.

डिजिटल बँकिंग सर्विस

या सुट्टीच्या दिवशी नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, अ‍ॅप, UPI, एटीएमसारखी डिजिट सुविधा आधीप्रमाणेच काम करणार आहे. म्हणजेच तुम्ही ऑनलाइन ट्रांजेक्शन करू शकता.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद
महिला कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; मासिक पाळीच्या रजेला हायकोर्टाची स्थगिती