PM Modi यांची कॅनडाचे नवीन पंतप्रधान Mark Carney सोबत बातचित, G7 Summit साठी मिळाले निमंत्रण

Published : Jun 06, 2025, 07:38 PM IST
PM Modi यांची कॅनडाचे नवीन पंतप्रधान Mark Carney सोबत बातचित, G7 Summit साठी मिळाले निमंत्रण

सार

कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शुक्रवारी टेलिफोनवर चर्चा झाली. पंतप्रधान कार्नी यांनी मोदींना G7 समिटसाठी आमंत्रित केले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी (Mark J Carney) यांच्याशी शुक्रवारी फोनवरून चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना अलिकडच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन केल्यानंतर G7 समिटच्या आमंत्रणासाठी धन्यवादही मानले. टेलिफोनवरून कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना G7 समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. समिट या महिन्याच्या अखेरीस कॅनडातील कॅनानास्किस (Kananaskis) येथे होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी फोन कॉलची माहिती एक्सवर शेअर करत लिहिले की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांच्याशी फोनवरून बोलून आनंद झाला. अलिकडच्या निवडणुकीतील त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कॅनानास्किस येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेत आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

 

 

लोकशाही मूल्यांवर आणि सामायिक हितांवर सहकार्य

पंतप्रधान मोदींनी भारत-कॅनडा संबंधांना गतिमान लोकशाही (vibrant democracies) म्हणून संबोधले आणि म्हटले की, दोन्ही देश परस्पर आदर आणि सामायिक हितांवर आधारित काम करतील.

G7 समिटमध्ये होणार महत्त्वाची भेट

मोदींनी असेही म्हटले की, ते G7 समिटमध्ये मार्क जे. कार्नी यांना भेटण्यास उत्सुक आहेत. खरे तर, मार्क कार्नी पंतप्रधान झाल्यानंतर भारत आणि कॅनडातील तणावपूर्ण द्विपक्षीय संबंध सुधारण्याची शक्यता वाढली आहे. मागील सरकारच्या काळात शीख फुटीरतावाद, राजनैतिक वाद आणि व्यापारी अडथळ्यांमुळे दोन्ही देशांचे संबंध प्रभावित झाले होते. अशा परिस्थितीत ही चर्चा दोन्ही देशांसाठी सहकार्याची नवी सुरुवात असू शकते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

NEET UG 2026 : अंतिम अभ्यासक्रम वेबसाईटवर जाहीर, NTA ने दिली माहिती
Face authentication: UPSC परीक्षेत आता डमी उमेदवाराची केवळ 10 सेकंदात ओळख पटणार