अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा (Ram Mandir Opening) 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे कोणाकोणाला आमंत्रण देण्यात आले आहे, जाणून घ्या.
Ram Mandir Opening News : अयोध्येमध्ये श्री राम मंदिराचा भव्यदिव्य असा उद्घाटन सोहळा वर्ष 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी क्रिकेट विश्वातील दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, रतन टाटा यासह अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे.
22 जानेवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता जवळपास 8 हजार लोकांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे, यामध्ये 3 हजारहून अधिक व्हीव्हीआयपी पाहुण्यांचा समावेश आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी मंदिर कारसेवेशी जोडल्या गेलेल्या कुटुंबीयांनाही विशेष स्वरुपात आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय सुमारे 50 परदेशी पत्रकार, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, पत्रकार, कवींसहीत विविध क्षेत्रातील बड्या व्यक्तींनाही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे.
22 जानेवारीला होणार राम मंदिराचे उद्घाटन
22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेषतः रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेमध्ये राम व सीतामातेची भूमिका निभावणाऱ्या अरूण गोविल व दीपिका चिलखिया यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आरएसएस प्रमुख मोहन भागवत, योगगुरू बाबा रामदेव, 4 हजार साधू संत, लेखक, पत्रकारही या सोहळ्यात हजर राहणार आहेत.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव काय म्हणाले?
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय म्हणाले की, आम्ही 50 देशांतील किमान एक प्रतिनिधी आमंत्रित करत आहोत. कारसेवेदरम्यान बलिदान दिलेल्या 50 कारसेवकांचे कुटुंबीयही येणार आहेत. राय यांनी पुढे असेही सांगितले की, आम्ही पुजारी, शंकराचार्य, सरकारी कर्मचारी, निवृत्त लष्करी अधिकारी, संगीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्यांनाही आमंत्रित केले आहे.
राम जन्मभूमी ट्रस्टच्या सचिवांनी मूर्तीबद्दल दिली ही माहिती
राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले की, रामलल्ला सध्या पाच वर्षीय बालकाच्या स्वरुपात विराजमान आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी आम्ही तीन मूर्ती तयार केल्या आहेत. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आम्ही सर्वात सुंदर मूर्तीची निवड केली आहे.
संपूर्ण तयारी झाली आहे - शरद शर्मा
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले की, देशविदेशातील जवळपास आठ हजार पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहेत. आमची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे आणि पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत 2080 म्हणजेच सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी रामलला आपल्या जागी विराजमान होतील आणि संपूर्ण जग या क्षणाचे साक्षीदार असेल.
आणखी वाचा :
Javeria Khanum : जवेरियाचा भारतीय तरुणाला लव्हेरिया! आणखी एक पाकिस्तानी तरुणी होणार भारताची सून
Video: जन्मत: हात नाहीत, उत्तमरित्या पायाने चालवते कार; केरळच्या तरुणीची प्रेरणादायी कथा
Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अॅलर्ट जारी