अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाकडून मागितला 7 दिवसाचा अतिरिक्त जामीन, यामागचं कारण आल समोर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तब्येतीचे कारण देऊन अतिरिक्त जामीन मागितला आहे. त्यांच्या वकिलांनी टेस्ट बाकी असून यासंदर्भात तपासणीसाठी जामीन आवश्यक असल्याचे न्यायालयात म्हटले आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या अंतरिम जामिनावर बाहेर असून पुढील महिन्यात ते तुरुंगात जाणार आहेत. त्यांनी न्यायालयाकडे सात दिवसांचा अतिरिक्त जामीन वाढवून मिळावा अशी मागणीही केली आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरोग्याच्या गंभीर समस्यांचा हवाला देत, श्री केजरीवाल यांनी 7 किलो वजन कमी झाल्यानंतर आणि केटोनची पातळी वाढल्यानंतर पीईटी-सीटी स्कॅनसह वैद्यकीय चाचण्यांची गरज असल्याचे सांगितले आहे. 

आधी केला होता जामीन मंजूर - 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार त्यांना या तारखेच्या दुसऱ्या दिवशी तिहार तुरुंगात जावे लागणार होते. पण त्यांनी आता परत आपल्याला अतिरिक्त दिवसांचा जामीन मागितला असून यामध्ये मेडिकलसाठी आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल चाचण्या आणि इतर अतिरिक्त कामासाठी जामीन देणे आवश्यक असल्याचे त्यांच्या वकिलांच्या वतीने सांगण्यात आले आहे. न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना विशेष वागणूक मिळाल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळतो का नाही हे लवकरच समजणार आहे. 
आणखी वाचा - 
पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टर सेवेशी केली गद्दारी, डॉ. अजय तावरे यांना अटक
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर जवळून करण्यात आला गोळीबार, परिसरात तणावाचे वातावरण

Share this article