
दिव्याज फाउंडेशनतर्फे आज NSCI डोम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस, दिविजा फडणवीस आणि अभिनेत्री श्रीलीला उपस्थित होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी योगामुळे मन, शरीर आणि आत्म्याला होणाऱ्या फायद्यांबाबत भाष्य केले. तसेच विद्यार्थ्यांसाठीही संदेश दिला. अभिनेत्री श्रीलीलानेही योग जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले.