अजित पवार रोज सकाळी दहा लोकांना धमक्या देत आहेत, संजय राऊत यांनी केली टीका

Published : Apr 29, 2024, 12:19 PM IST
Sanjay Raut

सार

अजित पवार यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी अजित पवार रोज मतदारसंघातील लोकांवर टीका करत असल्याचे म्हटले आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत हे रोज वेग वेगळ्या स्टेटमेंटमुळे चर्चेत येत असतात. आता ते परत एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी यावेळी म्हटले आहे की, "मोदींना माझा सवाल आहे की, त्यांनी हसन मुश्रिफांवर कारवाई करावी, आमचे जे लोक घेतले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी मोदींची भ्रष्टाचाराच्या विरोधातील बांग ही फक्त घोषणा असून त्यांनी सर्व भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना पक्षामध्ये नेत्यांना स्थान दिले आहे. 2019 च्या शपथविधीबद्दल अजित पवार बोलले आहेत. 

अजित पवार रोज सकाळी दहा लोकांना देतात धमक्या - 
अजित पवार रोज सकाळी उठून दहा लोकांना धमक्या देत आहेत, अशी वैचारिक विधान तुम्हाला शोभत नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहचवणे योग्य आहे. गुजरातच्या ठेकेदार आणि व्यापारी यांना फायदा पोहचवणे हा यामागचा प्रमुख फायदा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. 

सरळ् सरळ धूळफेक होत आहे - 
अफगाणिस्तान, बहरीन आणि मॉरिशस हे छोटे देश असून तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा भेटत आहे. ही सरळ सरळ धूळफेक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नसीम खान यांच्या उमेदवारीबद्दल संजय राऊत यांनी भाष्य दिल आहे. ते मुंबई काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. आमच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. काँग्रेसकडे ज्या जागा आहेत त्याबाबतचा निर्णय त्यांचा आहे, आम्ही महाविकास आघाडी धर्माचा पालन करू त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून नसीम खान यांना उमेदवारी नाकारल्याशी आमचा काहीही संबंध नाही. 
आणखी वाचा - 
Maharashtra HSC Board Results 2024 : 12 वी बोर्डाचा निकाल या तारखेला लागण्याची शक्यता, येथे तपासून पाहता येईल रिजल्ट
मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना बसणार उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा इशारा

PREV

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!