एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, अपघाताचे रहस्य उलगडणार

Published : Jun 13, 2025, 09:06 PM ISTUpdated : Jun 13, 2025, 09:52 PM IST
ahmedabad plane crash

सार

अहमदाबाद येथील एअर इंडिया एक्सप्रेसच्या अपघातस्थळी पोलिसांनी शोधमोहीम राबवून 'ब्लॅक बॉक्स' ताब्यात घेतला आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) असून, घटनेमागील कारणे शोधण्यास मदत होईल. 

अहमदाबाद | प्रतिनिधी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या भीषण अपघाताच्या तपासात गतीमिळाली आहे . पोलिसांनी अपघातस्थळी शोधमोहीम राबवून अखेर 'ब्लॅक बॉक्स' ताब्यात घेतला आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) असून, या घटनेमागील नेमकी कारणं शोधण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

हा अपघात नेमका कसा घडला, त्याआधी पायलट व क्रूने काय संवाद साधला, तांत्रिक बिघाड झाला होता का, हवामानाचं स्वरूप काय होतं, हे सारे तपशील ब्लॅक बॉक्समधून समजण्याची शक्यता आहे. सध्या ते विश्लेषणासाठी संबंधित एव्हिएशन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास अहमदाबाद विमानतळाजवळ हा अपघात घडला होता. विमानात १८० प्रवासी होते, त्यातील काही जण गंभीर जखमी झाले आहेत. विमानातील एक प्रवासी सोडून सर्वांचा मृत्यू झाला आहे. DGCA व एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांनी यावर स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

एअर इंडिया व केंद्र सरकार याबाबत कोणतीही ढिलाई न करता तातडीने प्रत्यक्ष चौकशीस सुरुवात केली आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली आहे. आगामी काळात ब्लॅक बॉक्समधील डेटा सार्वजनिक केला जाईल आणि दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत मिळाले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Lionel Messi India Visit : 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी भारतात दाखल, ‘GOAT इंडिया टूर 2025’ला भव्य सुरुवात
मेस्सी-मेस्सीच्या घोषणांनी दुमदुमले कोलकाता, रात्री उशिरा पोहोचला GOAT