Ahmedabad Plane Crash: एक स्फोट आणि सगळीकडे धुरच धूर, फोटोमध्ये पाहा अहमदाबाद विमान अपघाताचं दृश्य

Published : Jun 12, 2025, 03:57 PM ISTUpdated : Jun 12, 2025, 05:04 PM IST

अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. लंडनला जाणारं हे विमान उड्डाण करताना भिंतीला धडकलं. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह २४२ प्रवासी होते.

PREV
15
विमान क्रॅश होताच धमाका

अहमदाबाद विमानतळाजवळ गुरुवारी दुपारी मोठा अपघात झाला. एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान क्रॅश झालं आहे. उड्डाण करताना विमान एका भिंतीला धडकलं आणि धमाका झाला. अपघात होताच धुराचे लोट आकाशात जाताना दिसले.

25
विमानात २४२ प्रवासी होते

एअर इंडियाच्या या विमानात २४२ प्रवासी होते आणि हे विमान लंडनला जात होतं. मात्र उड्डाण करताना ते विमानतळाच्या भिंतीला धडकलं.

35
विजय रुपाणीही विमानात होते

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही या विमानात होते. सर्व प्रवाशांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट नाही. प्रशासन, अग्निशमन दल आणि NDRF घटनास्थळी पोहोचले आहेत.

45
क्रॅशचे व्हिडिओ व्हायरल

विमान क्रॅशचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात धुराचे लोट आकाशात जाताना दिसत आहेत.

55
डॉक्टर्सच्या इमारतीला धडक

ज्या भिंतीला विमान धडकलं त्या इमारतीत सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर्स राहतात. काही डॉक्टर्स जखमी झाल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरू आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories