भारतात विवाहित महिलांना घरात किती सोने कायदेशीररीत्या ठेवता येते? काय आहे नियम..

Published : Jun 12, 2025, 12:27 PM ISTUpdated : Jun 12, 2025, 12:43 PM IST

भारतात सोने खरेदी ही गुंतवणूक आणि भावनिक बाब आहे. विवाहित महिला ५०० ग्रॅम, अविवाहित महिला २५० ग्रॅम आणि पुरुष १०० ग्रॅम सोने ठेवू शकतात. मर्यादेपेक्षा जास्त सोने असल्यास उत्पन्न स्रोताचा पुरावा द्यावा लागतो.

PREV
18
सोने, सर्वांना आकर्षित करणारे

आनंदाच्या प्रसंगी एकमेकांना भेटवस्तू देणे हे एक अत्यंत आनंददायी क्षण असतो. त्यात जर भेट वस्तू म्हणून सोनं असेल, तर देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही दुहेरी आनंद मिळतो. भारतात सोने खरेदी करणे हे केवळ गुंतवणुकीसाठी नसून एक भावनिक विषय असतो. लग्न, सण, नवीन वर्ष यासारख्या शुभ प्रसंगी सोने खरेदीचा उत्साह वाढतो. प्रत्येक साजऱ्या प्रसंगात जसे की लग्न, बाळंतपण सोनं दागिन्यांचं महत्त्व खूप असतं.

28
मर्यादेपेक्षा अधिक सोने असल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते

सोने आणि सोन्याचे दागिने हे सुरक्षित व स्थिर गुंतवणूक म्हणून पाहिले जातात. सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सुरक्षेसाठी बरेच जण आपले दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात, तर काही प्रमाणात घरातही ठेवतात. आता पाहूया उत्पन्न कर नियमांनुसार घरात सोने ठेवण्याच्या मर्यादा काय आहेत. या मर्यादेत राहिल्यास कोणताही प्रश्न निर्माण होत नाही, पण जर ही मर्यादा ओलांडली तर कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

38
विवाहित महिलांसाठी किती सोने ठेवता येते?

विवाहित महिलेला ५०० ग्रॅमपर्यंत सोने किंवा सोन्याचे दागिने घरात ठेवण्याची परवानगी आहे. लग्नाच्या वेळी आई-वडील आपल्या ऐपतीनुसार मुलीला सोने देतात. दोन्ही कुटुंबांतून आलेल्या दागिन्यामुळे एकूण सोन्याचे प्रमाण वाढते. म्हणून कायद्याने ठरवलेली ही मर्यादा लागू होते.

48
अविवाहित महिलांसाठी किती?

अविवाहित महिला २५० ग्रॅमपर्यंत सोने ठेवू शकतात. पुरुषांना मात्र फक्त १०० ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे. ही मर्यादा प्रत्येक व्यक्तीवर लागू होते. म्हणजेच घरात जर दोन विवाहित महिला असतील, तर त्या एकत्र १ किलो (१००० ग्रॅम) सोने ठेवू शकतात. विवाहित जोडपं मिळून ७५० ग्रॅमपर्यंत सोने ठेवू शकतात.

58
मर्यादा ओलांडल्यास काय?

जर तुमच्याकडे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल, तर उत्पन्न कर विभागाला त्याचा पुरावा द्यावा लागेल. जर खरेदीचे योग्य बिल, कर भरण्याचे पुरावे असतील, तर काही अडचण येणार नाही. मात्र बिल नसल्यास किंवा उत्पन्न स्रोताचा पुरावा नसल्यास, आणि जर करचुकवेगिरी आढळली, तर चौकशी किंवा छाप्यामध्ये अडचण होऊ शकते. वारसाहक्क, भेटवस्तू किंवा खरेदी यांचे योग्य दस्तऐवज असणे आवश्यक आहे.

68
सोने खरेदी करताना काही मर्यादा आहेत का?

होय. ₹२ लाखांपेक्षा जास्त रकमेचे सोने रोख रकमेने खरेदी करताना PAN कार्ड अनिवार्य आहे. ₹१०,००० पेक्षा जास्त व्यवहार बँकेद्वारे करणे आवश्यक आहे. नेहमी खरेदीवेळी आपल्या नावासहित, किंमतीसह अधिकृत पावती घ्या.

78
घरी सोने कायदेशीररीत्या कसे ठेवावे?

बँकेचे लॉकर वापरणे हा सुरक्षित पर्याय आहे, ज्यासाठी वार्षिक शुल्क असते. एखाद्या तपासणी किंवा छाप्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते.

88
डिजिटल गोल्ड

PhonePe, Paytm यांसारख्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्ड खरेदी करता येते. हे कायदेशीर असून ट्रॅक करणे सोपे असते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories