
मुंबई - भारतातील सर्वात मोठ्या खाजगी थर्मल पॉवर प्लांट अदानी पॉवर लिमिटेडने विशेष घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की त्यांना भागलपूरच्या पीरपैंती येथे बांधण्यात येणाऱ्या २,४०० मेगावॅटच्या थर्मल पॉवर प्रकल्पातून उत्तर बिहार पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड आणि दक्षिण बिहार पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडना २,२७४ मेगावॅट वीज पुरवण्यासाठी बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडकडून लेटर ऑफ इंटेंट मिळाला आहे.
निविदा प्रक्रियेत अदानी पॉवर सर्वात कमी बोली लावणारे होते, ज्यांची अंतिम पुरवठा किंमत KWh ६.०७५ रुपये होती. कराराचा भाग म्हणून, कंपनी एका ग्रीनफिल्ड ३X८०० मेगावॅट अल्ट्रा सुपरक्रिटिकल पॉवर प्लांटमधून वीज पुरवठा करेल, जो डिझाईन, बिल्ड, फायनान्स, मालकी आणि ऑपरेट मॉडेल अंतर्गत स्थापन केला जाईल. पहिला टप्पा ४८ महिन्यांत आणि शेवटचा ६० महिन्यांत सुरू होईल.
अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस बी ख्यालिया म्हणाले, बिहारमध्ये २,४०० मेगावॅटचा थर्मल पॉवर प्रकल्प विकसित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी निविदा मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आम्ही सुमारे ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून एक नवीन ग्रीनफिल्ड प्लांट उभारणार आहोत. ज्यामुळे राज्याच्या औद्योगिकीकरणाला आणखी मदत होईल अशी अपेक्षा आहे. आमचा प्लांट हा एक प्रगत, कमी उत्सर्जन करणारा अल्ट्रा-सुपरक्रिटिकल असेल आणि राज्याला विश्वासार्ह, स्पर्धात्मक किमतीत आणि उच्च दर्जाची वीज पुरवेल.
भारत सरकारच्या ऊर्जा धोरणांतर्गत वाटप केलेल्या कोळशाच्या जोडणीतून या पॉवर प्लांटला इंधन मिळेल असे समजते. प्रकल्पाच्या बांधकाम टप्प्यात सुमारे १० हजार ते १२ हजार आणि सुरू झाल्यानंतर सुमारे ३ हजार रोजगार निर्माण होतील.
अदानी पॉवर हा आदानी पोर्टफोलिओचा एक भाग आहे. जी भारतातील सर्वात मोठी खाजगी थर्मल पॉवर उत्पादक कंपनी आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, तामिळनाडूमध्ये मिळून १२ पॉवर प्लांट आहेत. या कंपनीची १८,११० मेगावॅट थर्मल पॉवर उत्पादन क्षमता आहे. तसेच गुजरातमध्ये ४० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आहे.