
भोपाळ : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मध्यप्रदेशातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव 7 ऑगस्ट रोजी राजगड जिल्ह्यातील नरसिंहगड येथून लाडकी बहीण योजनेचा 27 वा हप्ता वितरित करणार असून, यावेळी 1.26 कोटींपेक्षा अधिक महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने ₹250 चा विशेष भेट दिली जाणार आहे. ही भेट म्हणजे दर महिन्याला मिळणाऱ्या ₹1250 च्या नियमित रकमेच्या अतिरिक्त, मुख्यमंत्री यादव यांच्याकडून बहिणींसाठी भाऊ म्हणून दिलेलं एक प्रेमाचं प्रतीक असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचे स्पेशल गिफ्ट देणार का?
मुख्यमंत्री डॉ. यादव 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2:45 वाजता नरसिंहगड येथून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि राखी स्पेशल भेट रक्कम एकत्रितपणे जारी करतील. “महिला माझ्यासाठी केवळ मतदार नाहीत, त्या माझ्या बहिणी आहेत. त्यांचा सन्मान आणि सुरक्षितता ही माझी जबाबदारी आहे,” असं भावनिक वक्तव्य सीएम यादव यांनी केलं आहे.
मध्यप्रदेश सरकारने बहिणींसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यंदाच्या दिवाळीनंतर येणाऱ्या भाऊबीजेपासून लाडक्या बहिणींना दरमहा ₹1500 मिळणार आहेत. सध्या मिळणाऱ्या ₹1250 रकमेची ही वाढ असून, 2028 पर्यंत ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवून ₹3000 पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरणासाठी सरकार दरमहा ₹1500 कोटींपेक्षा अधिक निधी थेट त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करत आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्पष्ट केलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जशा प्रकारे लोकसभा-विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, त्याच धर्तीवर मध्यप्रदेश सरकारही महिलांच्या रोजगार, आरक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सतत पुढाकार घेत आहे. राज्य सरकार स्व-सहायता गट, शासकीय नोकऱ्या, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतांमध्ये महिलांना संधी देण्यासाठी कार्यरत आहे.
मुख्य ठळक मुद्दे
1.26 कोटी लाडक्या बहिणींना ₹250 चा राखी स्पेशल भेट
सध्या मिळणाऱ्या ₹1250 च्या अतिरिक्त रक्कम
7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:45 वाजता वितरण
भाऊबीजनंतर दरमहा ₹1500 रक्कम मिळणार
2028 पर्यंत रक्कम वाढवून ₹3000 करण्याचं लक्ष्य
महिला सशक्तीकरणासाठी मासिक ₹1500 कोटी निधी ट्रान्सफर
सीएम यादव यांचा भावनिक संदेश
"महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन हेच माझं ध्येय आहे. माझ्या बहिणी कुठल्याही अडचणीत येऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे." रक्षाबंधनाचे हे गिफ्ट केवळ आर्थिक मदत नसून, राज्याच्या प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी एक भावनिक बांधिलकी आणि भाऊ म्हणून दिलेलं प्रेमाचं प्रतीक आहे.