थलापति विजयकडून अखेर 'तमिलगा वेत्तरी कझगम' पक्षाच्या झेंड्याचे अनावरण

Thalapathy Vijay Political Party Flag : साउथ सिनेमातील अभिनेता थलापति विजयने आज (22 ऑगस्ट) अधिकृतरित्या आपल्या राजकीय पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केले आहे. थलापति विजयच्या राजकरणातील एन्ट्रीने अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Thalapathy Vijay Political Party Flag : साउथमधील सुपरस्टार थलापति विजय सध्या दोन कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक म्हणजे थलापतिचा आगामी सिनेमा GOAT आणि दुसरे कारण म्हणजे राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा. खरंतर, थलापति विजयने लोकसभा निवडणुकीआधीच राजकरणात एन्ट्री केली होती. अशातच आज (22 ऑगस्ट) थलापति विजयने आपल्या राजकीय पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केले आहे.

थलापति विजयकडून 'तमिलगा वेत्तरी कझगम' झेंड्याचे अनावरण
अभिनेता थलापति विजयने अधिकृतपणे आपल्या राजकीय पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केले आहे. थलापतिने तमिलगा वेत्तरी कझगम नावाची राजकीय पक्ष स्थापन केला आहे. झेंडा लाल आणि पिवळ्या रंगात असून त्यावर दोन हत्ती आणि मधोमध एक चिन्ह देखील आहे.

काय म्हणाला थलापति विजय?
अभिनेता आणि तमिलगा वेत्तरी कझगम (Tamilaga Vettri Kazhagam Party) राजकीय पक्षाचा प्रमुख विजयने पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनोगत व्यक्त केले आहे. थलापतिने म्हटले की, "तुम्ही सर्वजण आमच्या पहिल्याच राज्यातील परिषदेची वाट पाहत आहात. यासंदर्भात तयारी सुरू असून याबद्दल लवकरच घोषणा केली जाईल. याआधी आम्ही आमच्या राजकीय पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केले आहे. मला अत्यंत गर्व वाटत आहे. तमिळनाडूच्या विकासासाठी आपण सर्वेजण एकत्रित काम करुयात."

थलापति विजयची सोशल मीडियावरील पोस्ट
थलापति विजयने झेंड्याचे अनावरण करण्याआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. हा झेंडा पनाईयुर येथील पक्षाच्या कार्यालयात झेंड्याचे अनावरण होईल असे विजयने पोस्टमध्ये म्हटले होते. झेंड्यासह राजकीय पक्षाचे गाणे देखील लाँच करणार असल्याची माहिती थलापति विजयने दिली होती.

वर्ष 2026 मध्ये निवडणूक लढवणार?
थलापति विजयची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्सकडून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वर्ष 2026 मध्ये तमिळनाडूच्या विधानसभेची निवडणूक थलापति विजय लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्याने यंदाच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. याशिवाय थलापतिने विधानसभा निवडणूकीत उतरणार असल्याचे म्हटले होते.

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोलंडमध्ये चक्क मराठीतून भाषण, पाहा VIDEO

भाजपने 9 उमेदवारांची राज्यसभा उमेदवारीची यादी केली जाहीर, राज्यातून कोण?

Share this article