बदलापूर अत्याचार प्रकरण संतापाची लाट, 21 ऑगस्टच्या टॉप 10 बातम्या

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला असून राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. विरोधी पक्षांनी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Rameshwar Gavhane | Published : Aug 21, 2024 3:17 PM IST

  1. बदलापूर अत्याचार प्रकरणी संतापाची लाट, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला असून राज्यभर संतापाची लाट पसरली. विरोधी पक्षांनी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

2. अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, SIT प्रमुख आरती सिंह बदलापुरात दाखल

एसआयटी पथकाच्या प्रमुख आरती सिंह बुधवारपासून तपासाला सुरुवात करणार आहेत. आरोपी अक्षय शिंदे याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कसून चौकशी केली जाणार आहे.

3. बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

बदलापूर प्रकरणी जनतेचा उद्रेक हा मिंधे सरकार विरोधात असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणी त्यांनी एसआयटी चौकशीची गरज काय होती?, असा सवाल उपस्थित केला आहे.

4. बदलापूर प्रकरण : सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची केली मागणी

बदलापूर येथील शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुळे म्हणाल्या की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून महिलांवरील अत्याचार वाढत आहेत.

5. 'लाडकी बहीण' योजनेवरुन प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'लाडकी बहीण' योजनेवरुन प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुलींच्या सुरक्षेची हमी मागितली आहे.

6. मुंबईत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींवर अत्याचार, खारमध्ये धक्कादायक प्रकार

मुंबईतील खार दांडा परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमन सिंग याला अटक केली आहे. ही घटना समोर येताच परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

7. अकोल्यात 6 विद्यार्थिनींचा विनयभंग, अश्लील व्हिडीओ दाखवल्याचाही शिक्षकावर आरोप

Akola Crime : महाराष्ट्रातील अकोल्यात जिल्ह्या परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवल्याचाही त्याच्यावर आरोप लावण्यात आला आहे.

8. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीसाठी नितीन पाटील यांनी भरला अर्ज

महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. धैर्यशील पाटील यांच्या नावानंतर आता नितीन पाटील हे दुसऱ्या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करतील.

9. ओबीसी विरुद्ध मराठा?, शेंडगेंचा 288 जागा लढवण्याचा एल्गार!

प्रकाश शेंडगे यांनी विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केलाय. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण नको असल्याची भूमिका कुणीही घेत नसल्याने आणि राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक होणार असल्याने हा निर्णय घेतला आहे.

10. शरद पवार यांना केंद्राची 'झेड प्लस' सुरक्षा मिळणार?, कारण काय? घ्या जाणून

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असून त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी ही सुरक्षा स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

 

 

 

 

 

Share this article