अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांनी विवाह केल्याचे वृत्त समजले आहे. या दोघांनी तेलंगणातील वाणापार्थी जिल्ह्यातील रंगनाथ स्वामी मंदिरात विवाह केला.
अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांनी विवाह केल्याचे वृत्त समजले आहे. या दोघांनी तेलंगणातील वाणापार्थी जिल्ह्यातील रंगनाथ स्वामी मंदिरात विवाह केला. हा विवाह वधू वरांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती मिळाली आहे. तामिळनाडूतील पुजार्यांनी पूजा करून लग्नाचे कार्य पार पडले आहे. आदिती राव यांचे आजोबा वाणपर्थी संस्थांचे शेवटचे शासक होते आणि कुटुंब या मंदिरात प्रार्थना करत असायचे.
हे मंदिर अठराव्या शतकात बांधल्याची माहिती देण्यात येते. या दोघांनी मिळून माहसमुद्रम या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि तेव्हापासून दोघांमधील ओळख चांगली वाढली होती. तेव्हापासून ते नात्यात होते, अलीकडेच त्यांनी सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून नात्यात असलेल्या बातमीला दुजोरा दिला. सिद्धार्थने हिंदी चित्रपटांसोबतच तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केले होते.
त्याने रंग दे बसंती, चिथा यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या होत्या. अदिती राव हैदरी हिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मल्याळम चित्रपट सृष्टीतून केली. तिने प्रजापती चित्रपटात सर्वात आधी भूमिका निभावली होती. तिने इतरही अनेक चित्रपटांमधून भूमिका निभावल्या होत्या.
आणखी वाचा -
माझे पती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 28 मार्चला पुराव्यासह सत्य उघड करतील, सुनीता केजरीवाल यांनी केला दावा
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख