उत्तर प्रदेश पोलिसातील महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ झाला व्हायरल, महिलेला केले जाणार निलंबित?

डिजिटल युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही लेव्हलला जाऊन काहीही करायला तयार आहेत. त्यामध्ये अगदी पोलीस दलातील लोकही मागे नसल्याचे दिसून येत आहे.

vivek panmand | Published : Apr 17, 2024 2:51 PM IST / Updated: Apr 17 2024, 08:23 PM IST

डिजिटल युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही लेव्हलला जाऊन काहीही करायला तयार आहेत. त्यामध्ये अगदी पोलीस दलातील लोकही मागे नसल्याचे दिसून येत आहे. एक रील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या गणवेशातील या महिलेचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकला आहे. त्या महिलेच्या पोषाखाने सगळ्या सोशल मीडियात वाद होत चालला आहे. 

सोशल मीडियावर कमेंट झाल्या व्हायरल - 
या व्हरायल झालेल्या जगभरातील नेटिझन्सने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलीस गणवेशातील व्यक्ती अशा प्रकारच्या रिल्स कशी करू शकते यावर नेटिझन्सने रिप्लाय दिले आहेत. पोलीस महिलेच्या अकाउंटवर ती लखनऊ पोलिसात कामाला असल्याचे दिसून येते. 2017 मध्ये त्या पोलीस महिलेने नोकरी सुरु केल्याची दिसून आली आहे. 

सोशल मीडियावर प्रतिक्रिया झाल्या व्हायरल - 
अनेक युझर्सने यावर प्रतिक्रिया देताना पोलीस महिलेला वर्दीची तरी इज्जत ठेव असा सल्ला दिला आहे. अनेक जणांनी या व्हिडिओवर लव्हचे कमेंट केले आहे. पोलिसमधील असणाऱ्या व्यक्तीने वर्दीवर अशा प्रकारचा व्हिडीओ बनवणे किती योग्य आहे ते आधी समजून घ्यावं लागणार आहे. एका युझरने पोलीस पदाची तयारी करायची आहे असं म्हटले आहे. 
आणखी वाचा - 
पाकिस्तानमध्ये सोशल मीडियाचा 'हा' प्लॅटफॉर्म बंद, वापरकर्त्यांनी या निर्णयाबद्दल व्यक्त केला संताप
हेलिकॉप्टरमध्ये बसून पंतप्रधानांनी टॅबलेटवर राम लल्लाचे सूर्य टिळक पाहिले - पाहा व्हिडिओ

Share this article