पेपरफुटीची सखोल चौकशी होणार, सरकार सीजेपीसोबत चर्चेस तयार

Published : Jul 22, 2026, 10:00 PM IST
J P Nadda

सार

केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पेपरफुटी हा गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. सरकार यावर संसदेत चर्चा करण्यास तयार असून विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांमागील सत्य तपासले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलणे त्यांनी टाळले.

दिल्ली: संपूर्ण देशात सध्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सध्या सगळीकडं चर्चा सुरु आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनातून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता या मुद्यावर बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण जे पी नड्डा यावेळी काय बोलले ते समजून घेऊयात.

पेपरफुटी हा गंभीर विषय 

पेपरफुटीचा विषय हा गंभीर विषय असल्याचं जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत आणि संसदेमध्ये चर्चा करण्यात येईल. सीजेपीसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. विद्यार्थ्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते बरोबर आहेत. सरकार आता प्रत्येक मुद्यामागील सत्य तपासून पाहणार आहे. त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

राहुल गांधी यांच्यावर काय बोलले? 

राहुल गांधी यांच्याबद्दल यावेळी बोलताना जे पी नड्डा यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याचा सरकारकडून अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर आम्ही सर्व सत्य जनतेसमोर मांडणार आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जात आहे. पण यावर बोलणं जे पी नड्डा यांनी टाळल आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: पोलिसांचा अजब जुगाड! टीव्ही स्क्रीनवरूनच स्कॅन करून फाडलं गाडीचं चलन
राहुल गांधींच्या फोटोतील 'ती' महिला कोण, खरी माहिती आली समोर