
नवी दिल्ली : दिल्लीतील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी महत्त्वाची दिली आहे. सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास ते तयार असल्याचं सांगण्यात आहे. तसंच सीजेपीला चर्चा करायची आहे, असा खोटा दावा सरकारने केला होता, असंही ते म्हणाले. मात्र आता सरकारने स्वत:चं चर्चेसाठी तयार आहोत, असं म्हटल्याचं दास यांनी सांगितलं आहे.
सरकारला चर्चा करायची आहे, पण एक अट - CJP
सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी या चर्चेसाठी महत्त्वाची अट सरकारपुढे ठेवली आहे. चर्चेसाठी येताना सीजेपीकडून कोणत्याही राजकारणी व्यक्तीच्या कार्यलयात किंवा निवासस्थानी चर्चा, बैठक होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. सरकारला चर्चा करायची असल्यास त्यांनी एकतर जंतरमंतर यावं किंवा कॉन्स्टिट्यूशन क्लब यासारख्या एखाद्या कॉमन ठिकाणी मिटिंग होऊ शकते.
सौरव यांनी पुढे बोलताना सांगितलं, की ज्या दिवशी पहिल्यांदा आंदोलन करण्यात आलं, त्याचदिवशी सरकारने चर्चा करायला हवी होती. कालदेखील सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव आला होता. आम्ही सर्व शिक्षित आहोत, चर्चेतूनच तोडगा निघू शकेल, आम्हालादेखील माहिती आहे, असं सरकारकडून नमूद करण्यात आलं होतं.
२० जुलै रोजी सरकारसोबत पहिली चर्चा
कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकार यांच्यात पहिल्यांदा सोमवारी, २० जुलै रोजी चर्चा झाली. यावेळी सरकारकडून जे.पी. नड्डा यांनी सीजेपी शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांवर सरकारमध्ये चर्चा होईल, असं आश्वासन दिलं होतं. जे.पी. नड्डा यांच्यासोबतची पहिली भेट त्यांच्या निवासस्थानी झाली होती. आंदोलकांच्या वतीने सीजेपीकडून सौरव दास आणि आशुतोष रांका या दोन प्रतिनिधींनी नड्डा यांच्याकडे मागण्याचं निवेदन दिलं होतं.
आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, देशभरात संतापाची लाट
जे.पी. नड्डा यांच्याशी पहिल्यांदा चर्चा झाली, त्याच दिवशी २० जुलैला आंदोलकांकडून संसेदवर मोर्चा नेला जात होता. मात्र पोलिसांनी मोर्चा रोखला. यावेळी मोठा गोंधळ झाला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेला. या मारहाणीत अनेक आंदोलक जखमी झाले, अनेकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. या लाठीचार्जनंतर, पोलिसांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीनंतर देसभरातून संतापाची लाट उसळली असून दिल्ली पोलिसांच्या कृत्याचा, तसंच मोदी-भाजप सरकारवर संतप्त टीका केली जात आहे.