नोएडातील एका व्यक्तीने गर्लफ्रेंडची गळा दाबून केला खून, स्वतः गळा चिरून आत्महत्येचा केला प्रयत्न

Published : Mar 29, 2024, 02:56 PM ISTUpdated : Mar 29, 2024, 02:57 PM IST
Murder of lover who visited girlfriend in Bihar

सार

नोएडामध्ये एका व्यक्तीने तिच्या 22 वर्षीय मैत्रिणीचा गळा दाबून खून केला आणि नंतर ब्लेडने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

नोएडामध्ये एका व्यक्तीने तिच्या 22 वर्षीय मैत्रिणीचा गळा दाबून खून केला आणि नंतर ब्लेडने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्याच्याकडून माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. 

घटनास्थळी नेमकं काय घडले?
अतिरिक्त डीसीपी हिरदेश कथेरिया यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेबाबत बोलताना सांगितले की, "पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा दोघेही जखमी अवस्थेत आढळून आले. तेथे गेल्यानंतर महिला आणि पुरुष दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला रुग्णालयात पोहचल्यानंतर मृत झाली आणि पुरुष जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. 

हत्या झाल्यानंतर पुढे काय झालं? 
अधिकाऱ्याने पुढील माहिती सांगितली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचे नाव निशा असल्याचे सांगण्यात आले आहे. निशा आणि धनंजय कुमार यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समजली आहे. बुधवारी निशा धनंजय यांना भेटायला त्यांच्या घरी आली असताना वाद झाला आणि त्याच्यात धनंजय याने निशाची गळा दाबून हत्या केली. धनंजय 302 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आणखी वाचा - 
मला बसता येत नाही, उठता येत नाही, मृत्यूपूर्वी मुख्तार अन्सारी आणि मुलगा ओमर यांच्यात झाला होता संवाद
गायीची विक्री झाली तब्बल 40 कोटींना, आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील शेतकरी झाला मालामाल

PREV

Recommended Stories

आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!
Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!