Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर निघणार महा रॅली, आपच्या वतीने केले जाणार आयोजन

दिल्ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आप पक्षाच्यावतीने आणि कार्यकर्त्यांच्यावतीने मोर्चा आणि आंदोलन काढून निषेध व्यक्त केला आहे.

vivek panmand | Published : Mar 24, 2024 11:46 AM IST / Updated: Mar 24 2024, 05:17 PM IST

दिल्ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आप पक्षाच्यावतीने आणि कार्यकर्त्यांच्यावतीने मोर्चा आणि आंदोलन काढून निषेध व्यक्त केला आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशी रामलीला मैदानावर अटकेच्या विरोधात महा रॅली काढली जाणार आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली. त्यांना 28 मार्चपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. आप दिल्लीचे संयोजक गोपाळ राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ईडी किंवा इतर संस्थाचा वापर करून धमकावत आहे. ते जे सोबत येतील त्या लोकांना पक्षात घेताना दिसत आहे. 

गोपाळ राय यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, "अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात देशातील सर्व पक्ष एकवटले आहेत. देशभरात केजरीवाल यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. राम लीला मैदानावर या विरोधात महा रॅली काढली जाणार आहे. येथे सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी यावेळी भाजपवर टीका केली आहे. 
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 :अमेठी आणि रायबरेलीतुन काँग्रेसला मिळेना उमेदवार? 46 उमेदवारांसह चौथी यादी जाहीर
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा मार्ग लवकरच होणार खुला, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

Share this article