आसनसोल येथे रामलला अवतरले ! 9 वर्षाच्या मुलाला मेकअप आर्टिस्टने दिले अयोध्येतील श्रीरामांचे रूप

पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे राहणाऱ्या मेकअप आर्टिस्टने एका 9 वर्षाच्या मुलाला अयोध्येतील रामललांचे रूप दिले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ram Lalla in West Bengal Asansol : अयोध्येतील (Ayodhya( राम मंदिरात रामललांची मूर्ती प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगिराज (Arun Yogiraj) यांनी तयार केली आहे. यामुळे अरुण योगिराज जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. अशातच पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे राहणाऱ्या आशीष कुंडू आणि त्याची पत्नी रूबी कुंडू यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर, आशीष आणि रूबीने मिळून एका 9 वर्षीय मुलाला अयोध्येतील रामललांचे (Ram Lalla) रूप दिले आहे.

आसनसोल येथे अवतरले रामलला
आशीष आणि रूबी यांनी एका महिन्यामध्ये 9 वर्षीय मुलाला चक्क अयोध्येतील रामललांचे रुप दिले आहे. मेकअपच्या माध्यमातून कोलकातामधील कपलने अद्भूत कौशल्य दाखवत जणू रामललांना जीवंत केल्यासारखे वाटत आहे.

आशीष यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, 22 जानेवारी 2024 रोजी रामललांच्या प्राणप्रतिष्ठेवेळीच रामललांची मूर्ती तयार करण्याची मनात इच्छा होती. पण काही कारणास्तव इच्छा पूर्ण झाली नाही. देशातील नागरिकांनी आपली कला पाहण्यासाठी रामललांसंदर्भात काहीतरी करायचे होते. यासाठी आशीष यांची भेट 9 वर्षीय अबीर नावाच्या मुलाशी झाली.

अबीरला मिळाले रामललांचे रूप
आशीष यांनी अबीरच्या आई-वडिलांना त्याला रामललांचे रूप देण्यासाठी परवानगी मागितली. अबीरच्या पालकांनी परवानगी दिल्यानंतर आशीष आणि रूबीने मिळून रामललांच्या मूर्तीसारखे अबीरला तयार करण्यासाठी तयारी सुरू केली.

अशीष आपल्या पत्नीसोबत एक ब्युटी पार्लर चालवतात. सकाळी पार्लरचे काम करतात. त्यानंतर रात्रीच्या वेळेस रामललांचे रूप तयार करण्यासाठी कपल एक महिनाभर प्रयत्न करत होते. अखेर एका महिन्यातच त्यांना अबीरला अयोध्येतील रामललांचे रूप देण्यासाठी यश मिळाले.

स्पंजपासून तयार करण्यात आले दागिने
अबीरला रामललांचे रुप देताना त्यासाठी लागणारे दागिने स्पंजपासून तयार करण्यात आले आहेत. अबीरला रामललांच्या रूपात पाहून सध्या सर्वजण हैराण झाले आहेत. सर्वांना अबीरकडे पाहून असे वाटतेय की, रामलला खरोखरच आसनसोल येथे अवतरले आहेत.

आणखी वाचा : 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कोणता निर्णय घेणार?

सर्वोच्च न्यायालयाने सीएएवरील स्थगितीला दिला नकार, अधिक माहिती घ्या जाणून

बंगळुरूमधील मेघना फूड्स कंपनीवर कर्नाटक आणि गोवा आयकर खात्याची धाड, संपूर्ण प्रकरण घ्या जाणून

Share this article