30th May 2025 Live Updates : उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणात आज कोर्टात सुनावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. अशाच ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या…

12:03 AM (IST) May 31
DGCA ने इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत संपवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे इंडिगोला लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा पुन्हा आढावा घ्यावा लागणार आहे.
11:41 PM (IST) May 30
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. ९ दिवस फरार असलेल्या चव्हाणने अटक टाळण्यासाठी मोबाईल आणि एटीएमचा वापर टाळला होता.
11:18 PM (IST) May 30
11:05 PM (IST) May 30
कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिने साखळदंडाने बांधलेल्या 40 वर्षीय महिलेला पोलिसांनी मुक्त केले आहे. मानसिक आजाराचे कारण देत कुटुंबीयांनी हे क्रूर कृत्य केले.
10:49 PM (IST) May 30
दिल्लीतील उद्योग भवनमध्ये शुक्रवारी बॉम्बचा धोका असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले. उद्योग भवनमध्ये अनेक केंद्रीय सरकारी विभाग असल्याने सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई सुरू केली.
10:28 PM (IST) May 30
10:14 PM (IST) May 30
10:03 PM (IST) May 30
09:46 PM (IST) May 30
मुंबईच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची शैली दाखवत गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली.
09:20 PM (IST) May 30
शुक्रवारी, वैभव सूर्यवंशी आणि त्याचे पालक यांना पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीत वैभवने पंतप्रधान मोदींच्या पायांवर माथा टेकून आदर व्यक्त केला.
08:38 PM (IST) May 30
यामुळे गुन्हे नियंत्रण, वाहतूक, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ प्रतिबंध, आणि विशेष कृती विभाग यासारख्या महत्त्वाच्या खात्यांना नव्या नेतृत्वाची धुरा मिळणार आहे.
08:27 PM (IST) May 30
08:21 PM (IST) May 30
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा करत नेपाळमध्ये त्याचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
07:32 PM (IST) May 30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ शुक्रवारी इथिओपियातील बोले आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे त्यांचे इथिओपियातील भारतीय राजदूत अनिल कुमार राय यांनी स्वागत केले.
07:31 PM (IST) May 30
भारतातील १० सर्वात प्रसिद्ध आंब्यांचे उगमस्थान, नाव आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या. हापूसपासून दशेरी आणि लंगडापर्यंत, प्रत्येक आंब्याची एक वेगळी कहाणी आहे.
07:21 PM (IST) May 30
06:20 PM (IST) May 30
05:57 PM (IST) May 30
चालत्या रेल्वेच्या दारावर रील्स बनवत असताना एका तरुणीचा हात सुटून ती खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
05:44 PM (IST) May 30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील शेतात १ किलो वजनाचा कांदा सापडला आहे. गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी हा कांदा शेतातून काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
05:43 PM (IST) May 30
रुग्णाच्या समोर कपडे काढणाऱ्या एका परिचारिकेचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने दिलेले कारण ऐकून सगळेच थक्क झाले आहेत!
05:34 PM (IST) May 30
जोधा आणि अकबरची प्रेमकहाणी जगप्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ही कथा सर्वांनाच माहिती आहे. पण आता या कथेला एक नवा ट्विस्ट मिळाला आहे.
05:21 PM (IST) May 30
थायलंडच्या फुकेटमधील टायगर किंग्डममध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केला आहे.
05:13 PM (IST) May 30
“दृश्यम ३” चित्रपटाच्या या नव्या घडामोडींमुळे चित्रपट रसिकांमध्ये नवीन उत्सुकता निर्माण झाली असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
04:15 PM (IST) May 30
गोव्याजवळील INS विक्रांतवर राजनाथ सिंह यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर हे फक्त लष्करी कारवाई नाही तर दहशतवादाविरुद्ध भारताचा थेट हल्ला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवादी कृत्य केले तर त्याला परिणाम भोगावे लागतील.
03:51 PM (IST) May 30
ओडिशा विजिलन्स अधिकाऱ्यांनी ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकून २.१ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली.
03:13 PM (IST) May 30
थायरॉईडच्या आरोग्यासाठी आहारात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. थायरॉईडच्या आरोग्यासाठी आहारात समाविष्ट करावयाच्या काही पोषक पदार्थांची ओळख करून घेऊया.
01:51 PM (IST) May 30
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी सध्या चांगलाच राजकीय रंग चढला आहे.
01:38 PM (IST) May 30
अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर एक फेसबुक चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर मराठी मनोरंजनसृष्टीत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावरच आता सुदेश म्हशिलकरांनी मौन सोडलं आहे.
01:00 PM (IST) May 30
मुंबई पोलिसांना स्मार्ट डिजिटल आयडी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे बनावट पोलीस ओखळपत्रांच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. हे ओखळपत्र पोलीस आयुक्त ते शिपाई अशा सर्व पदांवरील कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.
12:18 PM (IST) May 30
येत्या 1 जूनपासून काही नियमांत बदल होणार आहेत. यानुसार एलपीजी सिलिंडर ते क्रेडिट कार्डचे काही नियम बदलणार आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
12:12 PM (IST) May 30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात परकीय आयातीवर लादलेले मोठ्या प्रमाणातील आयात शुल्क (टॅरिफ) पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
10:53 AM (IST) May 30
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या विधान परिषदेतील आमदार के. कविता यांनी गुरुवारी पक्षातील काही नेत्यांवर थेट आरोप केले आहेत. याशिवाय पक्ष भाजपामध्ये विलीनीकरण करण्यावरही प्रश्न उपस्थितीत केला आहे.
09:38 AM (IST) May 30
हडपसर येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
09:27 AM (IST) May 30
Mumbai : वरळीतील दोन सी-फेसिंग ड्युप्लेक्स अपार्टमेंट्ससाठी कोट्यावधी रुपयांची खरेदी झाल्याचे समोर आले आहे. खरंतर, अपार्टमेंट्स तब्बल 639 कोटींना खरेदी करण्यात आले आहेत.
09:08 AM (IST) May 30
PBKS vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कालच्या सामन्यामध्ये दणदणीत विजय झाला. यावेळी विराट कोहलीसह संघातील सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पण विराट आणि अनुष्काचा रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात.
08:55 AM (IST) May 30
भारतीय नौदलाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या डॉकयार्डमधून पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी ठाण्यातील कळव्यातून एका अभियंत्याला अटक करण्यात आली आहे.
08:50 AM (IST) May 30
उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणात आज कोर्टात सुनावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यात कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.