यश राज फिल्म्सने सुरू केले वाईआरएफ स्क्रिप्ट सेल – जगभरातील पटकथा लेखकांना आपले विचार मांडण्याची संधी!

Published : Oct 01, 2025, 03:46 PM IST
yash raj films

सार

यश राज फिल्म्सने ५० वर्षांच्या परंपरेनुसार, 'वाईआरएफ स्क्रिप्ट सेल' हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या व्यासपीठाद्वारे, कंपनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी पुढच्या पिढीचे लेखक शोधत आहे आणि जगभरातील पटकथा लेखकांना त्यांच्या कल्पना सादर करण्याची संधी देत आहे.

५० वर्षांच्या परंपरेत, यश राज फिल्म्सने नेहमीच कंटेंट-फॉरवर्ड कंपनी म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. आपल्या पिढी-परिभाषित चित्रपटांद्वारे भारताचे पॉप कल्चर आणि सिनेमा घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आता हिंदी चित्रपटसृष्टी साठी पुढच्या पिढीचे लेखक शोधणे आणि त्यांच्यासोबत सर्जनशील सहकार्य करणे या हेतूने कंपनीने सुरू केले आहे वाईआरएफ स्क्रिप्ट सेल – एक असे व्यासपीठ जे जगभरातील पटकथा लेखकांना आपले विचार मांडण्याची संधी देते!

सीईओ काय म्हणतात?

यश राज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी म्हणतात,“वाईआरएफ नेहमीच बदलत्या काळानुसार स्वतःला ढाळत राहिले आहे आणि त्यामुळेच त्याची परंपरा टिकली आहे. आजच्या काळात हे क्रिएटर्सचे जग आहे, जिथे प्रत्येकजण एक कथाकार आहे आणि कंटेंट हाच राजा आहे. आम्हाला हे जाणवले आहे की नाविन्यपूर्ण आणि धक्कादायक पटकथा ह्याच सर्वात मौल्यवान संपत्ती आहेत. प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या कल्पना मांडणारे लेखक शोधणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.”

नवीन कल्पना देणारी मंडळी हवीत

ते पुढे म्हणाले,“वाईआरएफ स्क्रिप्ट सेल हा हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या सर्व लेखकांसाठी एक खुला आमंत्रण आहे. आम्हाला अशी पुढच्या पिढीची विचारवंत मंडळी शोधायची आहेत जी आम्हाला नाविन्यपूर्ण आणि मनमोहक कल्पना देतील , ज्या उद्याच्या सिनेमाला परिभाषित करतील. आमचे ध्येय असे नवीन सर्जक शोधणे आहे ज्यांच्याकडे कथा आहेत पण ज्यांना आमच्यापर्यंत किंवा आमच्या दिग्दर्शकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली नाही.”

लेखक आपला सिनॉप्सिस https://scripts.yashrajfilms.com/ येथे सबमिट करू शकतात. जर वाईआरएफ ला एखादी कल्पना पुढे नेण्यासारखी वाटली, तर कंपनी त्या लेखकाकडून पटकथेची मागणी करेल. ही वेबसाइट आजपासून सर्वांसाठी लाईव्ह आहे.

पोस्ट येथे पहा - 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!