जया बच्चन यांना हसताना पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल, काजोलने अशी जादू केली की...

Published : Sep 30, 2025, 02:57 PM IST
kajol and jaya bachhan

सार

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, ज्या अनेकदा पापाराझींवर रागावताना दिसतात, त्यांचा एक हसतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. दुर्गा पूजेदरम्यान काजोलसोबत काढलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या असून फोटो AI ने तयार केल्याचे म्हटले आहे.

जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन हे नेहमीच कोणत्या न कोणत्या मार्गाने चर्चांमध्ये राहत असतो. अनेकवेळा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. जया बच्चन या पापाराझींवर फोटो काढताना ओरडताना दिसून येत असतात. जया बच्चन यांचे फोटो, व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नेटकरी काय कमेंट करतात? 

अनेकदा नेटकरी जया बच्चन यांचे रागात असताना फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांना त्यांच्या वागणुकीसाठी अनेकदा ट्रोल केलं जातं. ज्या बच्चन यांचा एक हसलेला फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जया बच्चन या काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या सोबत दुर्गा पूजेत सहभागी झाल्या होत्या.

दरवर्षी मोठ्या उत्साहात दुर्गा पूजा केली जाते 

साजरी दरवर्षी काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या येथे दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी राहत असतात, जया बच्चन या कार्यक्रमात हजेरी लावत असतात. यावेळी काजोलने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काजोल व जया बच्चन या दोघीही हसताना दिसून येत आहेत.

यावेळी दोघीही पारंपरिक लूकमध्ये हसताना दिसून येत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. यावर एक नेटकरी म्हणतो की, जयाजी हसत आहेत, म्हणजे हे एआयने तयार केलेले आहे. दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, फक्त काजोलचा जयाजींना हसवू शकते. या पोस्टवर अनेकांनी कॉमेडी कमेंट केल्या आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!