शिव ठाकरे लग्न करणार नाही, नवऱ्याला ड्रममध्ये टाकलं जातंय, अजून काय बोलला?

Published : Jul 27, 2025, 08:08 PM IST
shiv thackeray

सार

बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत लग्नाबाबत धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पत्नींकडून पतींच्या हत्यांच्या वाढत्या घटनांमुळे त्यांना लग्नाची भीती वाटते. 

‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरे सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. या मुलाखतीत त्याने लग्नावर बोलताना एकदम मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं की, “अलिकडेच बातम्यांमध्ये पत्नींकडून पतींच्या क्रूर हत्यांच्या घटना घडल्यानंतर, त्याला संपूर्ण लग्न संस्थेची भीती वाटत होती. मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिव ठाकरे म्हणाला की, 'मला लग्नाची भीती वाटते. कारण हे मुलांचे कर्म आहेत, खरं तर, सध्या मुलांसोबत जे घडत आहे, ते आपल्या पूर्वजांनी वर्षांपूर्वी मुलींसोबत केलं होतं. लोक असा विचार करत आहेत की मुलांसोबत वाईट घडत आहे, कोणीतरी नवऱ्याला ड्रममध्ये टाकतंय. पण हे वर्षानुवर्षे मुलींसोबत घडत आहे. तर हे कर्म आहेत..'.” त्याच्या या विधानामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं आहे आणि सोशल मीडियावरही हे विधान व्हायरल होत आहे.

तो लग्नाचा विचार करत नाही 

शिव ठाकरेने स्पष्ट केलं की, सध्या त्याचा लग्नाचा काहीच विचार नाही. त्याने असेही सांगितले की, योग्य वेळ आल्यावर तो याबाबत नक्की विचार करेल. पण आत्ता तरी त्याचं संपूर्ण लक्ष करिअरवर आणि स्वतःच्या प्रगतीवर आहे. तो सध्या आपल्या कामामध्ये खूप व्यग्र आहे. त्याचं हे वक्तव्य त्याच्या विनोदी स्वभावाला शोभणारं आहे. शिव ठाकरे याने यापूर्वीही अनेक वेळा लग्न, प्रेम या विषयावर खुलेपणाने मत व्यक्त केलं आहे. त्याने म्हटलं होतं की, प्रेम आणि लग्न या गोष्टींबद्दल थोडी भीती वाटते, पण भविष्यात त्यावर मात करेल.

चाहत्यांमध्ये एक आकर्षण निर्माण 

त्याच्या अशा थेट बोलण्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावरही शिव ठाकरेचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे तो काहीही बोलला, की ते लगेच चर्चेत येतं असतं.

सध्या तरी तो कोणाशी रिलेशनशिपमध्ये नाही आणि कुठल्याही अभिनेत्रीबरोबर त्याचं नाव जोडलेलं नाही. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि कोणतेही गुपित न ठेवता सगळं मोकळेपणाने सांगितलं आहे. शिव ठाकरेच्या या विधानामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. लग्न आणि नातेसंबंध याबाबत त्याचं विचार मोकळा आणि हलकाफुलका आहे. तो कधी लग्न करणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नक्कीच लागली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Great Indian Kapil Show 4 : कपिल शर्मा ते सुनील ग्रोव्हर, स्टार्सची फी वाचून डोळे होतील पांढरे!
हृतिकसोबत डान्सनंतर सुझानची मुलांसाठी भावनिक पोस्ट, दोघेही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसह लग्नात सहभागी!