ऐश्वर्या सलमान ब्रेकअप: संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपबद्दल मोठा खुलासा केला आहे. 'देवदास' चित्रपटात सलमानऐवजी शाहरुख खानला घेतल्याने त्याला मोठा धक्का बसला होता आणि त्याच काळात दोघांचे ब्रेकअप झाले.
सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप का झाला, जवळच्या व्यक्तीनं केला 'हा' खुलासा
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या खाजगी आयुष्यामुळं परत चर्चेत आला आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघेही त्यांच्यातील अफेअरमुळे चर्चा सुरु झाली आहे.
26
सलमानच्या आणि ऐश्वर्याच्या जवळच्या व्यक्तींन केला धक्कादायक खुलासा
आता नुकताच अनेक वर्षानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने मोठा खुलासा केला. त्यावेळी काय घडले हे देखील स्पष्टपणे सांगितले. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली.
36
सलमान खान आणि भन्साळी यांच्यात उडाले खटके
सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यात खटके उडाले होते. भन्साळींसोबत ऐश्वर्याने हम दे दिल चुके है सनम या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट हिट झाला पण भन्साळी यांनी सलमानला चित्रपटात घेतलं नाही.
भन्साळींनी देवदास चित्रपटामध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला कास्ट केले. तो मोठा धक्का सलमान खानला बसला होता. त्यादरम्यानच ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या ब्रेकअपबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती आणि बातम्या देखील येत होत्या.
56
दोघांच्या ब्रेकअपनंतर बसला धक्का
दोघांच्या ब्रेकअपनंतर आम्हाला धक्का बसला होता आणि वाईट वाटले. ते दोघे खूप जास्त जवळ होते. मला वाटते की, त्यांनी भांडायला नव्हते पाहिजे. आम्हाला सर्वांनाच ही बातमी ऐकून वाईट वाटलं
66
सलमान खान समजूतदार
पण ठीक आहे हा सर्वकाही आता भूतकाळ आहे. सलमान खान देखील समजदार आहे, तो देखील यावर कधीच काही बोलत नाही. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले ब्रेकअप नक्कीच आहे.