गौतमी पाटील: नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या ड्रायव्हरने केलेल्या अपघातामुळे चर्चेत आहे. तिच्या अटकेची मागणी होत असताना, गौतमीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.
मागील काही दिवसांपासून नृत्यांगना गौतमी पाटील ही मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिच्या ड्रायव्हरचा झालेला अपघात आणि त्यानंतर गौतमीच्या अटकेची नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती.
26
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी गौतमीबद्दल कोणतं स्टेटमेंट केलं?
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली आणि त्यानंतर चौकशी करून तांत्रिक बाबी तपासल्यानंतर गौतमी त्या ठिकाणी नसल्याचं आढळून आलं. गौतमीने पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
36
ड्रायव्हरने देवदर्शनाला म्हणून गाडी नेली?
ड्रायव्हरने गौतमीला देवदर्शनाला जातो म्हणून तिच्याकडे गाडी मागितली. त्यानंतर त्याच्याकडून तो अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाणे योग्य नव्हते. तो जे वागला ते चुकीचे आहे. मात्र, अपघातावेळी मी नसतानाही मला ट्रोल केलं जात आहे. ट्रोल होणं माझ्यासाठी काही नवीन नाहीये.
मी तिथं उपस्थित नसताना मला दोष देणं चुकीचं आहे. अपघात झाल्यानंतर मी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी माझे भाऊ पाठवले होते. मात्र, संबंधितांनी मदत नाकारली, या संबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला होता, हा आरोप चुकीचा आहे, असं गौतमीने म्हटलं आहे.
56
चंद्रकांत पाटलांबाबत गौतमी काय म्हणाली?
गौतमी पाटील हिने चंद्रकांत पातकांबाबत स्टेटमेंट केलं आहे. दादांच्या बोलण्याचे मला वाईट वाटले, असं गौतमीने म्हटलं आहे. तिने मोरून लाखो रुपयांची मागणी करणारे निरोप येत आहेत. माझ्याशी अद्याप थेट कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यांची मागणी माझ्या आवाक्या बाहेरची आहे. त्यामुळे जे काय होईल ते कायद्यानुसार व न्यायालयाच्या आदेशानुसारच होईल, असं गौतमीने म्हटलं आहे.
66
गौतमी पाटीलवर अन्याय होतोय का?
गौतमी पाटीलवर अन्याय होत असल्याचं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तिला अटक करण्यात यावं, तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे. आता तुम्हाला काय वाटतंय गौतमी पाटीलवर अन्याय होतोय का हे जाणून घ्या.