Kantara Chapter 1 Box Office Collection: कांतारा चॅप्टर १ चित्रपटाने पहिल्या भागाच्या कमाईइतका आकडा केला पूर्ण, लवकरच १,००० कोटींचा आकडा पूर्ण करणार?

Published : Oct 09, 2025, 11:57 AM IST

कांतारा: चॅप्टर १: ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला असून त्याने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

PREV
16
कांतारा चॅप्टर १ चित्रपटाने पहिल्या भागाच्या कमाईइतका आकडा केला पूर्ण, लवकरच १,००० कोटींचा आकडा पूर्ण करणार?

कांतारा : चॅप्टर १ हा बहुप्रतीक्षित चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाने चांगली कमाई केली असून ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 

26
बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींकडे वाटचाल

कांतारा चॅप्टर १ या चित्रपटाने ३०० कोटींची कमाई केली असून ४०० कोटींकडे सुरु केली आहे. या चित्रपटाने पहिल्या चित्रपटाच्या कमाईइतका आकडा आधीच गाठला असून त्या चित्रपटाने एकूण २९० कोटी कमाई केली.

36
पहिल्याच दिवशी किती कमाई केली?

पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६१.८५ कोटींचा गल्ला कमवला आहे. दुसऱ्या दिवशी ४५.४ कोटी, तिसऱ्या दिवशी ५५ कोटी आणि सर्वाधिक कमाई ही रविवारी झाली. या चित्रपटाने आतापर्यंत ३०६.४२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

46
आतापर्यंत कमाई कशी झाली?
  • पहिला दिवस- 61.85 
  • दुसरा दिवस- 45.4 
  • तिसरा दिवस- 55 
  • चौथा दिवस- 63 
  • पाचवा दिवस- 31.5 
  • सहावा दिवस- 34.25 
  • सातवा दिवस- 15.42 
  • एकूण- 306.42
56
कांतारा चित्रपटाचा कांतारा चॅप्टर १ हा प्रीक्वल

कांतारा चित्रपटाचा कांतारा चॅप्टर १ हा प्रीक्वल असून यामध्ये ऋषभ शिट्टीने प्रमुख भूमिका केली आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच रुक्मिणी वलंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्या भागातील घटनांच्या एक हजार वर्षापूर्वी जे घडलं होतं, त्यावर आधारित या प्रीक्वेलची कथा आहे.

66
कथा अनुत्तरित प्रश्नांची उत्तर देते

‘कांतारा : चाप्टर वन’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आणखी खोलवर घेऊन जाते आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देते, अशी पहिली प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. पहिल्या भागात उपस्थितीत झालेल्या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या भागात देण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे.

Read more Photos on

Recommended Stories