सुसंस्कारी महाराष्ट्रात काय होतंय? प्राजक्ता माळीच्या वक्तव्यामुळे मनोरंजन क्षेत्रात उडाली खळबळ

Published : Oct 13, 2025, 05:30 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'मनाचे श्लोक' चित्रपटाला होत असलेल्या विरोधावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट बंद पाडल्याने, आपण लोकशाही असलेल्या सुसंस्कारी महाराष्ट्रात आहोत का, असा संतप्त सवाल तिने सोशल मीडियावर विचारला आहे.

PREV
16
सुसंस्कारी महाराष्ट्रात काय होतंय? प्राजक्ता माळीच्या वक्तव्यामुळे मनोरंजन क्षेत्रात उडाली खळबळ

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायमच चर्चेत राहत असते. तिने सोशल मीडियावर पोस्टमुळे ती परत एकदा माध्यमांमध्ये आली आहे.

26
इंस्टाग्रामवर कोणती पोस्ट शेअर केली?

प्राजक्ताने तिच्या अधिकृत अकाऊंटवरून माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपण सुसंस्कारी विचारांच्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही.

36
प्राजक्ताने काय म्हणाली?

प्राजक्ता म्हणाली की, मनाचे श्लोक चित्रपटाचं प्रमोशन करताना किमान महिनाभर आधी महाराष्ट्रात फिरलं. सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली. त्यानंतर अनेक लोकांनी चित्रपट प्रेक्षकगृहात जाऊन बंद पडला.

46
प्राजक्ता पुढे काय म्हणाली?

पुढे प्राजक्ता पोस्टमध्ये म्हणाली की, आपण लोकशाही असलेल्या भारतात, अतिशय सुसंस्कारी विचारांच्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही.. तीव्र निषेध! सध्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे.

56
सोशल मीडियावर पोस्ट झाली व्हायरल

सोशल मीडियावर प्राजक्ता माळीची पोस्ट व्हायरल झाली आहे. तिने मृण्मयी देशपांडेच्या मनाचे श्लोक या चित्रपटाला पाठिंबा दिल्याचे पोस्ट वरुन स्पष्ट होत आहे. त्याला प्रदर्शित झाल्यानंतर विरोध झाला आहे.

66
वादंग निर्माण झाला

या चित्रपटाचे नाव समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला विरोध केला आहे. हा हिंदूंच्या श्रद्धेचा “बाजार मांडण्यासारखा प्रकार” असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read more Photos on

Recommended Stories