Vijay Deverakonda Rashmika Mandanna: मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे.
Vijay Deverakonda Rashmika Mandanna: विजय देवरकोंडा- रश्मीका मंदाना यांच्या लग्नाची तारीख ठरली, साखरपुड्याचे फोटो झाले व्हायरल
मागील अनेक महिन्यांपासून विजय देवरकोंडा आणि रश्मका मंदाना हे दोघे रिलेशिनशिपमध्ये असल्याच्या बातम्या सुरु होत्या. प्रेक्षकांमध्ये हे खरंच नात्यात आहेत का हा प्रश्न पडत होता. पण या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून या दोघांनी साखरपुडा उरकल्याची बातमी समोर आली आहे.
26
एका खाजगी समारंभात साखरपुडा उरकला
एका खाजगी समारंभात या दोघांचा साखरपुडा उरकला आहे. या सोहळ्यासाठी कुटुंबातील अतिशय जवळची लोक उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक दिवसांपासून गीता गोविंदमधील ही जोडी रिलेशिनशिपमध्ये होती.
36
जोडीने सार्वजनिक ठिकाणी झाले स्पॉट
दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झालेले दिसून आले. त्या दोघांनी सोशल मीडियावर एकाच ठिकाणचे अनेकदा फोटो शेअर केलेले दिसून आलं आहे. एका मीडिया हाऊसने दिलेल्या माहितीनुसार दोघेही फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत.
रश्मीकाचे साडी घातलेले फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल
रश्मीकाचे अलीकडेच साडी घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. चाहते अनेक दिवसांपासून दोघांचा साखरपुडा व्हावा अशी इच्छा बाळगून होते, अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.
56
रश्मीकाने छावा चित्रपटात केलं काम
रश्मीकाने मंदाना हिने छावा चित्रपटात काम केलं होतं, तिच्या या कामाचे अनेक ठिकाणी कौतुक झालेलं आपल्याला दिसून आलं. आता लवकरच ती दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हॉरर-कॉमेडी सिनेमा 'थामा'मध्ये झळकणार आहे. तिच्यासह या सिनेमात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे.
66
अजून कोणासोबत करणार काम?
रश्मीका मंदाना या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून हा बहुप्रतिक्षित सिनेमा 21 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर विजय अलिकडेच गौतम तिन्नानुरी यांच्या तेलुगू स्पाय अॅक्शन-थ्रिलर सिनेमा 'किंगडम'मध्ये झळकला होता.