Kantara Chapter 1 Collection: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' ने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली असून, दोन दिवसांत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली असली तरी, चित्रपटाने एकूण १०५ कोटींचा गल्ला जमवला
Kantara Chapter 1 Collection: कांतारा चॅप्टर १ चित्रपटाने कमावले १०० कोटी, विकेंडला बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ
कांतारा चॅप्टर १ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांमध्ये १०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई केली होती.
26
पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी कमी झाली कमाई
पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई कमी झाली आहे. ऋषभ शेट्टी यांनी केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे. त्यांनी आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट चांगले चालले आहेत.
36
पहिल्या दोन दिवसांमध्ये कशी कमाई झाली?
दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४३.६५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी कमी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ६१.८५ कोटींची कमाई केली होती.
२ दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाची कमाई पाहून ऋषभ शेट्टी प्रचंड खुश असल्याचं दिसून आलं आहे. या चित्रपटाने एकूण १०५ कोटींची कमाई केली.
56
रविवारपर्यंत २०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
रविवारपर्यंत या चित्रपटाचा समावेश २०० कोटींच्या क्लबमध्ह्ये होईल असं सांगण्यात आलं आहे. या चित्रपटाचे बजेट १२५ कोटी रुपये होते, चित्रपट आता बजेटपेक्षा जास्त कमाई करेल असं दिसून येत आहे.
66
विकेंडला होईल जास्त कमाई
विकेंडला या चित्रपटाची जास्त कमाई होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०० कोटींच्या क्लबमध्ये विकेंडला समावेश होईल असं सांगण्यात आलं आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाचे चांगले रिव्ह्यू दिले आहेत.