Big Boss 19: बिग बॉसच्या घरातून 'हे' दोन स्पर्धक झाले बाहेर, नाव ऐकून म्हणाल असं कसं झालं?

Published : Nov 10, 2025, 09:50 AM IST

बिग बॉस १९ च्या घरातून अभिषेक आणि नीलम यांना बाहेर काढण्यात आले आहे. प्रणित मोरेला मिळालेल्या विशेष अधिकारामुळे नॉमिनेट झालेली अशनूर कौर सुरक्षित झाली, ज्यामुळे हे धक्कादायक डबल एव्हिक्शन झाले. या निर्णयामुळे घरातील इतर स्पर्धकांना मोठा धक्का बसला.

PREV
16
Big Boss 19: बिग बॉस १९ च्या घरातून 'हे' दोन स्पर्धक झाले बाहेर, नाव ऐकून म्हणाल असं कसं झालं?

बिग बॉस १९च्या घरात दरवेळेस काही न काही घडत असते. यावेळीही २ स्पर्धकांना घरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळं प्रेक्षक प्रचंड दुःखी झाले आहेत. हे दोन स्पर्धक कोण आहेत आणि त्यांना घराबाहेर का काढलं हे आपण जाणून घेऊयात.

26
अभिषेक आणि नीलमला दाखवला रस्ता

अभिषेक आणि नीलमला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. प्रणित मोरेला मिळालेल्या एका विशेष अधिकारानंतर नॉमिनेट झालेली अशनूर कौर सुरक्षित झाली. या दोघांच्या एलिमिनेट केल्यानंतर बाकी स्पर्धक दुःखी झाले आहेत.

36
तब्येतीच्या कारणास्तव प्रणित झाला होता बाहेर

प्रणित हा मागच्या आठवड्यात घरचा कॅप्टन होता, ण कॅप्टन्सी पूर्ण करण्याआधीच तब्येतीच्या कारणास्तव तो घराबाहेर गेला. घरात आल्यानंतर त्याला स्लमांकडून विशेष अधिकार देण्यात आला, त्यानुसार तो नॉमिनेट झालेल्या स्पर्धकाला वाचवू शकतो.

46
प्रणितने कोणाला वाचवले?

विशेष अधिकार मिळाल्यानंतर प्रणित अशनूरला वाचवतो. परिणामी नीलम आणि अभिषेकला घराबाहेर जावे लागले. प्रणितने अशनूरला वाचवल्यानंतर घरातील वातावरण बदलून गेलं होतं.

56
कोणाचं केलं एव्हिक्शन?

डबल एव्हिक्शन झाल्यानंतर नीलम स्वत:चे नाव ऐकून रडू लागते. तर नीलमसोबत बॉन्डिंग असणारे कुनिका सदानंद, तान्या मित्तल, अमाल मलिक, शहबाज बदेशा सर्वजण भावुक होतात.

66
अभिषेक घराबाहेर जाणार

अभिषेक घराबाहेर जाणार म्हटल्यानंतर अशनूर ओक्साबोक्शी रडू लागते. अभिषेकसाठी हा निर्णय खूपच धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वी त्याला विजेता म्हणून गृहीत धरले जात होते.

Read more Photos on

Recommended Stories