अभिषेक बच्चन: अभिनेता अभिषेक बच्चनला 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले, ज्यामुळे तो भावुक झाला. वडील अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अभिमान व्यक्त केला आणि प्रेक्षकांचे आभार मानले.
अमिताभ बच्चन यांनी सुनेबद्दल केलेलं स्टेटमेंट ऐकून व्हाल शॉक, ऐश्वर्या कोठे....
अभिषेक बच्चनला नुकताच फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार देण्यात आल्यानंतर अभिनेता भावुक झाला होता.
26
अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या त्याच्या भावना
यावेळी अभिषेक बच्चन याने याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने ऐश्वर्या आणि आराध्या दोघांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अभिषेक बच्चनचे वडील अमिताभ यांनी एक पोस्ट करून आपल्या भावना शेअर केल्या आहेत.
36
अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बच्चन कुटुंबातील ३ व्यक्तींना फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यामुळे अभिमान वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अमिताभ यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, एक, कुटुंब, एका कुटुंबातील ३ सदस्य. हे तीनही लोक क्षेत्रात काम करतात आणि तिघांना एकाच दिवशी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
56
प्रेक्षकांचे आभार मानले
यावेळी अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अमिताभ म्हणतात की, जया व मला हा पुरस्कार देण्यात आला होता. जया, अभिषेक आणि मी नशीबवान आहोत. प्रेक्षकांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
66
पोस्टवर प्रेक्षकांनी केल्या कमेंट
पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यावेळी अभिनंदन असं लिहून हर्ट दिले आहे. एकाने अमिताभ बच्चन यांना तुम्ही देशाचा अभिमान आहेत असं उद्देशून म्हणाले आहेत.