Kantara Chapter 1 Box Office Collection: कांतारा चित्रपटाने छप्परफाड केली कमाई, आकडा ऐकून डोक्याला लावाल हात

Published : Oct 08, 2025, 10:46 AM IST

Kantara Chapter 1 Box Office Collection: 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. १२५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास २९० कोटींची कमाई केली आहे.

PREV
15
Kantara Chapter 1 Box Office Collection: कांतारा चित्रपटाने छप्परफाड केली कमाई, आकडा ऐकून डोक्याला लावाल हात

कांतारा चॅप्टर १ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवला आहे. सुरुवातीलाच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळवली आणि नंतर विकेंड आल्यामुळे चांगले पैसे कमावले आहेत.

25
सोमवारी चित्रपटाने केली दमदार ओपनिंग

सोमवारी या चित्रपटाने चांगली ओपनिंग केली आहे. मंगळवारी या चित्रपटाने जवळपास ३३.५ कोटी रुपये कमावले असून आतापर्यंत एकूण जवळपास ३०० कोटींच्या आसपास कमाई झाली आहे.

35
चित्रपटाने एकूण किती कमाई केली?

कांतारा चॅप्टर १ या चित्रपटाने सुरुवातीपासून चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने जवळपास २९० कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ३०० कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

45
चित्रपट बनवायला किती खर्च आला?

चित्रपट बनवायला जवळपास १२५ कोटींचा खर्च आल्याचं सांगण्यात आलं आहे. हा चित्रपट आता सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करू शकतो.

55
कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट किती रुपये कमवू शकतो?

कांतारा चॅप्टर १ या चित्रपटाने आतापर्यंत १२५ टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. हा चित्रपट लवकरच ३०० कोटी कमावेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा चित्रपट या जादुई आकड्यापासून अजून १० कोटी लांब आहे.

Read more Photos on

Recommended Stories