बॉलिवूड दिग्दर्शिका फराह खान यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल खुलासा केला आहे. वडिलांच्या निधनानंतर आलेल्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना वयाच्या १५ व्या वर्षी काम करावे लागले.
पत्ते खेळायला आलेले लोक आमचं घर चालवत होते, बॉलिवूडमधील 'या' व्यक्तीनं केलं सनसनाटी विधान
फराह खान या बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका आहेत. सध्या त्या त्यांच्या युट्युब चॅनेलमुळे त्या खूप चर्चेत आल्या आहेत. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख तयार झाली आहे. आता त्यांनी संघर्षाबद्दल सांगितलं आहे.
26
फराह खान काय म्हणाल्या?
फराह खान यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल मत व्यक्त केलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या वडिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
36
त्यांच्या निधनानंतर १५ व्या वर्षी करावं लागलं काम
वडिलांच्या निधनानंतर फराह खान यांना १५ व्या वर्षी काम करावं लागलं होतं. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी पडली आणि त्यांनतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं.
फराह खान यांनी सानिया मिर्झासोबत संवाद साधला, त्यावेळी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. अचानक सगळं घडल्यामुळं आम्हाला एका मजल्यावरील फ्लॅट विकावे लागले, त्यानंतर आमच्याकडे एकही फ्लॅट राहिला नव्हता.
56
हॉल आणि रूम आईची होती
हॉल आणि रूम आईची असल्यामुळे त्या ठिकाणी पाहुणे मोठ्या प्रमाणावर येत असतं. तिथं आल्यानंतर लोक पत्ते खेळत बसायचे, ते आम्हाला खूप विचित्र वाटायचं पण आम्ही सहन करत होतो.
66
पत्ते खेळायला आलेले लोक किती रुपये ठेवायचे?
पत्ते खेळायला आलेले लोक आमच्यासाठी पाच पाच रुपये ठेवत असायचे, त्यातून आम्ही फळे आणि भाजीपाला खरेदी करायचो. ते जर पत्ते खेळायला आले नाही तर घरात काहीच बनत नव्हते.