वर्षा ताईंना ओळखत नाही : निकी तांबोळीच्या वक्तव्यामुळे बिग बॉसच्या घरात गोंधळ

Published : Sep 22, 2024, 10:49 AM IST
nikki tamboli

सार

मराठी बिग बॉसमध्ये निकी तांबोळीचा वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निकीने वर्षा उसगावकर यांना ओळखत नसल्याचे म्हटले आहे.

मराठी बिग बॉसमधील भांडण दिवसेंदिवस वाढलं चालल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सध्या निकी तांबोळी ही कायमच भांडताना दिसून येत आहे. घनश्याम दराडे आणि निकी तांबोळी यांची भांडण आणि बिग बॉसमध्ये आपण पाहिली असतील, पण यावेळी तिने मी कोणालाच ओळखत नाही असं म्हटलं आहे. निक्कीने मी फक्त अभिजित सावंतला ओळखत होते असं म्हटलं आहे. 

निक्की तांबोळींने नेमकं काय म्हटलं? 
येथे म्हणजे बिग बॉसच्या घरात कोण प्रसिद्ध आहे या मुद्द्यावरून हा वाद रंगला होता. यामध्ये प्रामुख्याने येथे वर्षा उसगावकर प्रसिद्ध आहे असं मला माहित नसल्याचं निकी तांबोळीने म्हटले. त्यांना मी आधी ओळखत नसल्याचा तिने यावेळी उल्लेख केला आहे. निकी तांबोळी असं बोलून नेमका कोणता उद्देश साधायचा प्रयत्न करत आहे हे या व्हिडीओवरून समजलं नाही. 

मला माहित नव्हतं की वर्षा ताई कोण आहेत, असं तिने यावेळी म्हटलं आहे. निक्कीने असं म्हटल्यावर यावेळी आजूबाजूच्या स्पर्धकांनी तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायला सुरुवात केली. निक्की असं बोलून नेमकं कोणाला टार्गेट करत आहे हे समजत नव्हतं. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!