बॅस्टियन ॲट द टॉप ते स्कार्लेट हाऊस, मुंबईतील टॉप 5 सेलिब्रिटी रेस्टॉरंट्स, एका दिवसाचे उत्पन्न कोटींच्या वर!

Published : Oct 27, 2025, 03:47 PM IST

Top 5 Celebrity Restaurants : मुंबईतील फूड सीन आता स्टार्सनी भरलेला आहे. विराट कोहली, करण जोहर, गौरी खान, शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोरा यांसारख्या सेलिब्रिटींनी रेस्टॉरंट्स सुरू केली आहेत. ही त्यांची स्टाईल, व्यक्तिमत्व आणि खाण्याची आवड दर्शवतात. 

PREV
16
सेलिब्रिटींच्या मालकीची रेस्टॉरंट्स

मुंबई शहर केवळ बॉलिवूड स्टार्सचेच नाही, तर खवय्यांसाठीही एक हॉटस्पॉट आहे. अनेक सेलिब्रिटींनी येथे रेस्टॉरंट्स सुरू केली आहेत, जी त्यांची स्टाईल आणि आवड दर्शवतात. विशेष म्हणजे त्यातून त्यांना उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे हे सेलिब्रिटी या रेस्टॉरंटकडे विशेष लक्ष देतात.

26
विराट कोहली – वन8 कम्युन

क्रिकेट सुपरस्टार विराट कोहली 'वन8 कम्युन'चा सह-मालक आहे. मुंबईतील हे कॅफे त्याचे स्पोर्टी आणि उत्साही व्यक्तिमत्व दर्शवते. येथे ग्लोबल फूड, हटके ड्रिंक्स आणि उत्साही वातावरण आहे. येथील पदार्थ जरा महाग आहेत. पण त्यांचा दर्जा उत्तम असतो. कोहली दिवसाला यातून १ कोटीच्या वर नफा कमवतो.

36
करण जोहर – न्यूमा

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर 'न्यूमा' नावाचे एक स्टायलिश बार आणि रेस्टॉरंट चालवतो. हे ठिकाण त्याच्या आकर्षक इंटेरिअर, उत्तम जेवण आणि सेलिब्रिटींसाठी प्रसिद्ध आहे. यातून करण दिवसला दीड तो दोन कोटी नफा कमवतो.

46
गौरी खान – टोरी

इंटिरियर डिझायनर आणि उद्योजिका गौरी खान 'टोरी' या लक्झरी जपान-प्रेरित रेस्टॉरंटची मालक आहे. हे रेस्टॉरंट गौरीच्या खास शैलीत असून, येथे उत्कृष्ट जेवणाचा अनुभव मिळतो. गौरी या रेस्टॉरंटकडे विशेष लक्ष देते.

56
शिल्पा शेट्टी – बॅस्टियन ॲट द टॉप

अभिनेत्री आणि फिटनेसप्रेमी शिल्पा शेट्टीने 'बॅस्टियन ॲट द टॉप'मध्ये गुंतवणूक केली आहे. हे एक हेल्दी फूड कॅफे आहे, जिथे फ्रेश ज्यूस, सॅलड्स आणि पौष्टिक जेवण मिळते. यातून शिल्पा दिवसाला दोन ते तीन कोटी रुपये कमवतो. दररोज हजारो लोक येथील जेवणाचा आनंद लुटतात.

66
मलायका अरोरा – स्कार्लेट हाऊस

मलायका अरोरा 'स्कार्लेट हाऊस'ची सह-मालक आहे. वांद्रे येथील 90 वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात हे युरोपियन-प्रेरित रेस्टॉरंट आहे. तिचा मुलगा अरहान खानही याचा सह-मालक आहे. तिच्या उत्पन्नाचा हा प्रमुख स्त्रोत आहे.

Read more Photos on

Recommended Stories