कधीकाळी वेटर म्हणून काम करणारा अक्षय कुमार आज २५९१ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्याकडे प्रायव्हेट जेट, आलिशान गाड्या आणि बंगले आहेत.
Akshay Kumar Birthday: एकेकाळी वेटर म्हणून केलं काम, आज आहे २५९१ कोटींची संपत्ती
कधीकाळी अक्षय कुमारने वेटर म्हणून काम केलं. तो आता राजेशाही लाईफ जगात असून त्याच्याकडे २५९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट असून कोट्यवधींच्या गाड्या आहेत.
26
अक्षय कुमार सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक अभिनेता
अक्षय कुमार हा इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका चित्रपटासाठी ८० ते १०० कोटी रुपये आकारत असतो. त्याचे वार्षिक उत्पन्न ५०० कोटी असून एकूण संपत्ती २५९१ कोटी आहे.
36
अक्षयकडे सीफेस बंगला
अक्षय कुमारकडे एक सीफेस बंगला असून तो तिथं त्याच्या कुटुंबासोबत राहतो. या आलिशान घरात एक लिविंग रूम, होम थिएटर, किचन, डायनिंग एरिया आणि वॉक-इन क्लोजेट आहे. त्याचा गोव्यामध्ये एक आलिशान व्हिला असून अनेकवेळा त्याच्या कुटुंबासह तो सुट्टी घालवण्यासाठी जात असतो.
46
अक्षय कुमारला आवडतात गाड्या
अक्षय कुमारला प्रचंड गाड्या आवडतात. त्याच्याकडे फॅंटमची सेवेंथ जनरेशन आहे ज्याची किंमत दोन वर्षांपूर्वी सुमारे 9 कोटी होती. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ फिफ्थ क्लास देखील आहे ज्याची किंमत सुमारे 1.10 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर आणि बेंटले सारख्या गाड्या आहेत. बाईकचे कलेक्शन मोठं आहे.
56
अक्षयकडे एक खाजगी जेट
अक्षय कुमारकडे स्वतःच असं एक प्रायव्हेट जेट असून त्याची किंमत २६० कोटी रुपये आहे. अक्षय त्याचा वापर प्रवासासाठी करत असतो. तो आरोग्याला सर्वात जास्त महत्व देत असून सकाळी उठून योगा आणि व्यायाम करण्यावर त्याचा भर असतो.
66
करिअरच्या सुरुवातीला वेटर म्हणून केलं काम
करिअरच्या सुरुवातीला अक्षय कुमारने वेटर म्हणून काम केलं आहे. त्यावेळी त्याचा पगार फक्त ५००० रुपये होता. तो आता राजासारखी लाईफ जगत असून इथपर्यंत पोहचायला त्याला अनेक कष्ट घ्यावे लागले.