अक्षय कुमार ५८ वर्षांचे झाले. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी दिल्लीत झाला. अॅक्शन, कॉमेडी आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अक्षय यांचा मुंबईत आलिशान बंगला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या बंगल्याचे इनसाईड फोटो बघा.
अक्षयचा जुहू, मुंबईतील बंगला, जिथे ते कुटुंबासह राहतात. ८० कोटींचा हा बंगला समुद्रकिनारी आहे. येथून समुद्राचे खुप सुंदर दृष्य दिसते. सुर्यास्त बघण्यासारखा असतो. एखाद्या राजवाड्यासारखा हा बंगला आहे.
28
ट्विंकलने सजवलेलं घर
ट्विंकल खन्नाने वेगवेगळ्या थीम वापरून घर सजवलंय. प्रत्येक सुविधेची काळजी घेतली आहे. येथील मोठा सोफा लक्ष वेधून घेतो. यावर आरामदायी पद्धतीने बसता येते. तसेच त्याच्या मागे असलेले वॉलपिस शोभून दिसते.
38
मॉडर्न आर्टचा वापर
घरात मॉडर्न पेंटिंग्ज आणि कलाकृती आहेत. ऑर्गेनिक थीमचा वापर केला आहे. त्यामुळे या बंगल्याला एक वेगळाच लुक प्राप्त झाला आहे. या पेंटिंग लक्ष वेधून घेतात. तसेच लाईट्सची सुंदर रचना करण्यात आली आहे.
काचेच्या मोठ्या खिडक्यांमुळे बाहेरील नजारा दिसतो. समुद्र जवळ असल्याने त्याचा नजरा बघण्यासारखा असतो. जेवणासाठी मोठा डायनिंग टेबल असतो. अक्षय नाश्ट्याला खूप महत्त्व देतो. तसेच जेवणही साजक ठेवतो.
58
युनिक बेडरूम
बेडरूमची सजावट वेगळी आहे. भिंतींचे रंग हलके आहेत. त्यावर वेगवेगळे वॉ़लपिस लावण्यात आले आहेत. येथील सोफ्याची उंची जरा कमी आहे. त्यामुळे पाय दुमडून छान आरामात बसता येते. होम थिएटरही आहे.
68
ट्विंकलचा खास रूम
लिहिण्या-वाचण्यासाठी खास रूम. अनेक पुस्तके आणि मॉडर्न आर्ट आहे. अक्षय यांची पत्नी ट्विंकल एक उत्तम लेखिका आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. अक्षयही कधी कधी पुस्तके वाचतो.
78
सुंदर बाग
बागेत विविध झाडे आहेत. राजेश खन्नांच्या आठवणीत आंब्याची झाडे लावली आहेत. येथे बसण्याची व्यवस्था आहे. सकाळी उठल्यावर येथे चहा घेण्यासाठी कुटुंब एकत्र येते. त्यावेळी अनेक विषयांवर गप्पा होतात.
88
बागेतील सजावट
बागेत बसण्याची व्यवस्था, मूर्ती आणि झूले आहेत. या बागेत अनेक तास बसून पुस्तक वाचता येऊ शकते. वाचनाचा थकवा जाणवत नाही.