
मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिलीप प्रभावळकर असून त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलं आहे. दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर स्वतःचा असा मापदंड तयार केला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर १२ व्या दिवशी ८५ लाखांची कमाई केली. एकूण आतापर्यंत चित्रपटाने १७.५० लाख रुपये कमावले आहेत. अकराव्या दिवशी याच चित्रपटाने ८० लाख रुपये कमवले होते. आतापर्यंत या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे.
दशावतार सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ५८ लाख रुपये कमावले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तब्बल १.४ कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी तर २.४ कोटी कमावले आणि पाचव्या दिवशी १.२५ कोटींचा गल्ला जमवला होता. सहाव्या दिवशी चित्रपटाने 1.3 कोटी आणि सातव्या दिवशी 1.25 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने आठव्या दिवशी 1 कोटी, नवव्या दिवशी 2.65 कोटी आणि दहाव्या दिवशी 3 कोटी कमावले.
दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी चांगला सपोर्ट केलं आहे. या चित्रपटात एका मल्याळम अभिनेत्याने काम केलं असून त्याच नाव सिद्धार्थ मेनन आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, प्रियदर्शिनी इंदलकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे आणि आरती वडगबाळकर यांच्याही महत्वाच्या भूमिका असून त्यांनी काम केली आहेत.